पंचवटी : गेल्या काही दिवसांपूर्वी पावसाने डोळे वटारल्यामुळे शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडत असल्याने सर्व प्रकारच्या फळ व पालेभाज्या महागल्या होत्या. परिणामी सर्वसामान्य ग्राहकांना त्याचा फटका बसत होता. मात्र आता फळभाज्यांची आवक वाढून बाजारभाव स्वस्त झाले असतानादेखील आठवडे बाजार व हातगाड्यांवर सर्वसामान्य ग्राहकांची लूटमार सुरू केली जात आहे.नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या भेंडी, टोमॅटो, दोडका, भोपळा, गिलका, ढोबळी, मिरची यांना प्रति किलोमागे जो बाजारभाव मिळतो त्या बाजारभावाच्या दीडपट दराने काही हातगाडीधारक तसेच आठवडे बाजारातील भाजीपाला विक्रेते विक्री करीत आहेत. हिरवी मिरची प्रतिकिलोसाठी किमान ४० रुपये दर असला तरी हातगाडीवर हिरवी मिरची ८० रुपये अन्य फळभाज्या २० रुपये किलो असताना ६० रुपये या दराने विक्री करीत आहे. विशेषत: उच्चभ्रू वसाहतीत असलेल्या भागात रोजच फळभाज्या व पालेभाज्याचे बाजारभाव बदलतात. गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या कोथिंबीरच्या प्रतिजुडीला ३३० रुपये असा उच्चांकी बाजारभाव मिळाल्यानंतर हातगाडीवर भाजीपाला विक्री करणाºया विक्रेत्यांची चंगळच झाली आहे. पूर्वी दोन ते तीन रुपयांना कोथिंबीरच्या काड्या दिल्या जात, मात्र आता तर किमान दहा रुपये कोथिंबिरीसाठी मोजावे लागत आहे. नागरी वसाहतीचा दर्जा जसा त्यानुसार बाजारभाव बदलू लागले आहेत.कोथिंबीर २० रुपये जुडीदोन आठवड्यापूर्वी एका शेतकºयाच्या कोथिंबीरीला विक्रमी भाव मिळाल्यानंतर किरकोळ बाजारात कोथिंबीरीचे भाव वाढविण्यात आले. पाच, दहा रुपयाला कोथिंबीरीच्या दोन चार काड्याच दिल्या जातात. बाजारात आता कोथिंबीर २० ते २५ रुपये जुडी मिळत असताना भरेकऱ्यांकडे मात्र अजूनही कोथिंबीरीचे भाव चढेच आहे.नाशिक बाजार समितीत दररोज सकाळी फळ व पालेभाज्यांची विक्री केली जाते. मात्र या ठिकाणचे बाजारभाव, हातगाड्या व आठवडे बाजारातील बाजारभाव किंवा रस्त्यावर रोजच विनापरवाना भरणाºया भाजीबाजारातील बाजारभाव यामध्ये भाजीपाला दरात मोठी तफावत आहे.
भाज्या स्वस्त तरीही किरकोळ विक्री महाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 12:33 AM