मार्चपासून कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाले. लॉकडाऊन म्हणजे काय याची कल्पना या भोळ्याभाबड्यांना नसल्याने ते बेसावधच राहिले.जसेजसे दिवस जाऊ लागले, तसतशी लॉकडाऊनची कल्पना त्यांना येऊ लागली. मात्र, हिच स्थिती राहील हे त्यांना माहीत नव्हते. पावसाळ्याच्या सुरु वातीला व पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात जंगलात रानभाज्या उगवतात. या रानभाज्या गावागावांत, शहरी भागांत विकल्याने आदिवासी, कातकरी बांधवांना मोठा रोजगार मिळतो. त्यामुळे त्यांच्या हातात चार पैसे येतात. त्यातून पावसाळ्याा त्यांना लागणाºया जीवनावश्यक वस्तू ते खरेदी करून आपला उदरनिर्वाह करतात. मात्र, यावर्षी उदरनिर्वाहाचा प्रश निर्माण झाला आहे. रानभाज्या आणून विकण्यासाठी त्यांना गावांत किंवा शहरात बाजारपेठच मिळाली नाही.स्थानिक ग्रामस्थांनीही कोरोनाच्या भितीपोटी आणलेल्या रानभाज्या विकत घेण्यास नकार दिला. त्यामुळे त्या टोपल्यातच सुकल्या. परिणामी, जे चार पैसे मिळायचे, तेही न मिळाल्याने आनंदावर विरजण पडले. यामुळे जीवन जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. रानभाज्या विकल्या न गेल्याने रोजची समाधानाची भाकरी तर हिरावून गेलीच, पण खाऊची वाट पाहणारी लहान मुले, खाऊविनाच झोपल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यातच यावर्षी पाऊस अल्प प्रमाणात पडल्याने अनेक रानभाज्या उगवल्याच नसल्याचे आदिवासी विक्र ेत्यांनी सांगितले. मात्र ज्या उगवल्या त्या कोरोनाच्या भितीपोटी विकल्या न गेल्याने घरातील अनेक जीवनावश्यक वस्तू घेता आल्या नाहीत याची खंत आदिवासी व्यक्त करतात.
रानभाज्या गावातच हिरमुसल्या; कोरोनामुळे मिळेना बाजारपेठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2020 3:02 PM
देवगाव : साधारण पावसाळा सुरू झाला की, निसर्ग हिरवाईचा शालू पांघरतो. सगळीकडे आल्हाददायक वातावरण असते. अशा वातावरणात अनेकांची पावले रानभाज्या खरेदीसाठी वळतात. ती थोडी महाग मिळते, पण हौसेला मोल नाही म्हणतात. या भाज्या लांब जंगलात जाऊन आणाव्या लागतात. पण,यंदा कोरोनाने सर्वांच्या आयुष्यात असा काही शिरकाव केला आहे, की तो जीवनच उद्ध्वस्त करून गेला. कालपर्यंत चांगल्या पगाराच्या नोकरीला असलेले आज बेरोजगार झाले. पावसाळ्यात रानभाज्या विकून उदरनिर्वाह करणाऱ्या आदिवासींना लॉकडाऊनचा फटका बसला आहे. त्या विकता न आल्याने आमचा आधारच हिरावून गेला, अशी भावना आदिवासींनी व्यक्त केली.
ठळक मुद्दे लॉकडाऊनचा फटका : आदिवासी बांधव रोजगाराला मुकले