येवला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून शहरातील नागरिकांची एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी व नागरिकांमधील संपर्क साखळी खंडित करण्यासाठी अत्यावश्यक सेवेसाठी नगर परिषदेने दिवस व जागा व वेळा निश्चित केल्या आहेत. शहरवासीयांना आठवड्यातून तीनच दिवस किराणा व भाजीपाला उपलब्ध होणार आहे.पालिका हद्दीतील सर्व किराणे दुकाने सोमवार, बुधवार व शुक्र वारी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात यणार आहेत. भाजीपाला, फळ विक्र ेते यांनी सोमवार, बुधवार व शुक्र वारी सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत हातगाडीवर फिरून किंवा शहरातील ठरवून दिलेल्या जागेत भाजीपाला विक्री करावा. भाजीपाला व फळ विक्र ीसाठी शहारातील मुख्य भाजी मार्केट, नागड दरवाजा रोड, गंगादरवाजा रोड, फत्तेबुरु ज नाका, विंचूर चौफुली, टिळक मैदान, काळा मारु ती रोड, आयना मशीद रोड, डॉ. लोखंडे हॉस्पिटलजवळ, कोटमगाव रोड, विठ्ठलनगर, ताज पार्क, मिल्लत नगर, हुडको कॉलनी, बदापूररोड, वल्लभ नगर या जागा परिषदेने निश्चित केल्या आहेत. तसेच संसर्ग टाळण्यासाठी ठरावीक अंतर पाळण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेच्या वतीने अत्यावश्यक सेवांचे वेळ व ठिकाण निश्चित केले असून, नागरिकांनी ठरवून दिलेल्या वेळेतच गरज असल्यास खरेदीसाठी बाहेर पडावे, असे आवाहन नगर परिषद मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांनी केले आहे.दूध विक्र ेत्यांनी दररोज सकाळी ६ ते ९ व सायंकाळी ५ ते ७ वाजेदरम्यान विंचूर रोड, मिलन मिठाईजवळ, डॉ. गायकवाड हॉस्पिटल, नागड दरवाजा रोड, फत्तेबुरु ज नाका, गंगादरवाजा रोड, देवी खुंट, हुडको कॉलनी, वल्लभ नगर, कोटमगाव रोड या ठिकाणी दुधाची विक्र ी करावी. दवाखान्याशी संलग्न सोडून सर्व मेडिकल दररोज सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत सुरू राहतील. पिण्याच्या पाण्याचे जार दररोज सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत घरपोच करण्यात येतील, असे नियोजन नगर परिषदेने केले आहे. यासंदर्भात संबंधिताना पालिकेने आदेश देत जागा ठरवून दिल्या आहेत.
तीनच दिवस मिळणार भाजीपाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 8:32 PM
येवला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून शहरातील नागरिकांची एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी व ...
ठळक मुद्देकोरोनावर उपाययोजना : येवल्यात विक्रेत्यांना सूचना