नाशिक : दुचाकी चालविताना मोबाइलचा वापर केला जात असल्याने अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यातूनच गंभीर दुखापत होते, तसेच काहींना जीवही गमवावा लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे दुचाकी चालविताना मोबाइलचा वापर करू नका, कार चालविताना सीट बेल्टचा वापर करा, असे आवाहन करत विद्यार्थ्यांनी वाहनधारकांमध्ये वाहतूक नियमांबाबत प्रबोधन केले. पोलिसांच्या ‘छोटा पोलीस’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी पाथर्र्डी फाटा येथे वाहनधारकांचे प्रबोधन केले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश कोल्हे, सचिव ज्योती कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन वाहनधारकांमध्ये जनजागृती घडवून आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी हेल्मेटचा वापर करणाऱ्या तसेच सीट बेल्टचा वापर करणाºया वाहनधारकांना गुलाबाची फुले भेट देत छोटा पोलीस उपक्र मांतर्गत धनलक्ष्मी शाळेतील विद्यार्थ्यांनी अभिनव पद्धतीने वाहनधारकांचे स्वागत केले, तसेच हेल्मेट व सीट बेल्टचा वापर न करणाºया वाहनधारकांना वाहतूक नियमांची माहिती दिली.
वाहतूक नियमांबाबत वाहनचालकांचे प्रबोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2018 12:52 AM