ठळक मुद्दे वाहनचालकांकडून ४ हजार २०० रुपयांचा दंडही वसूल
येवला : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस निरीक्षक भगवान माथुरे यांचे नेतृत्वाखाली शहरात दुचाकी व चारचाकी वाहनांची तपासणी करण्याची मोहीम सुरू आहे.या मोहिमेत २१ वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विना कागदपत्र असलेली वाहने, विना नंबर प्लेट, वाहतुकीचे नियम न पाळणे या कारणावरून २१ वाहनचालकांवर शहर पोलिसांतर्फे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबरोबरच काही वाहनचालकांकडून ४ हजार २०० रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.