पिंपळगाव बसवंत : जोपूळ रोड बाजार समिती परिसरात वाहनचालकाचा ताबा सुटल्याने दुभाजकावर आदळून कांद्याने भरलेले पिकअप वाहन भररस्त्यावर पलटी झाले. या अपघातात कांद्याचे व वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मंगळवारी (दि. ४) पहाटे सहा वाजेच्या सुमारास घडलेल्या या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही.चिंचखेड चौफुलीकडून जोपूळ रोड परिसरात असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दिशेने कांद्याने भरलेले पिकअप वाहन भरधाव वेगाने जात होते. चालकाचा ताबा सुटल्याने वाहन दुभाजकावर आदळून पलटी झाले. यात विजेचा खांबदेखील खाली पडला आहे. या अपघातात कांद्याचे आणि पिकअप वाहनाचे प्रचंड नुकसान झाले असून चालक किरकोळ जखमी झाला आहे. घटनेची माहिती पिंपळगाव पोलिसांना कळताच तातडीने पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रमोद देवरे यांनी घटनास्थळी येऊन अपघाताची पाहणी केली आणि रस्ता वाहतुकीसाठी खुला केला....तर जीवितहानी झाली असतीकांद्याने भरलेल्या पिकअप वाहनाचा अपघात सकाळी सहा वाजता झाल्याने मोठी दुर्घटना टळली. कारण बाजार समितीच्या परिसरात दररोज शेकडो वाहनांची वर्दळ असते. दरम्यान, घटना घडली त्याच परिसरात कोविड केअर सेंटर असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांचीदेखील ये-जा सुरू असते. अपघात घडला त्या वेळी त्या ठिकाणी कोणीही नसल्याने दुर्घटना टळली.
कांद्याने भरलेल्या वाहनाने भररस्त्यावर घेतली पलटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2021 11:53 PM
पिंपळगाव बसवंत : जोपूळ रोड बाजार समिती परिसरात वाहनचालकाचा ताबा सुटल्याने दुभाजकावर आदळून कांद्याने भरलेले पिकअप वाहन भररस्त्यावर पलटी झाले. या अपघातात कांद्याचे व वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मंगळवारी (दि. ४) पहाटे सहा वाजेच्या सुमारास घडलेल्या या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
ठळक मुद्देजोपूळ बाजार समिती परिसरात अपघात