ब्राह्मणगाव : गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने सटाणा-मालेगाव रस्त्यावर खड्डे पडल्याने दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना गाडी चालवताना कसरत करावी लागत आहे. संबंधित विभागाने त्वरित खड्डे बुजवावे, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.परिसरात पावसाने दमदार हजेरी न लावता संततधार सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. राज्य महामार्ग असल्याने अनलॉकनंतर या मार्गावर अवजड वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे खड्डे पडण्यास व असलेल्या खड्ड्यांचा आकार वाढण्यास मदत झाली आहे. दुचाकी चालकांना मात्र यातून मार्ग काढताना जिकिरीचे ठरत आहे. अपघात होण्याची भीती व्यक्त होत असून, ब्राह्मणगावजवळील खड्डे त्वरित बुजवण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे.सटाणा-मालेगाव रस्त्यावर ब्राह्मणगावजवळ रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमधून मार्ग काढताना वाहनधारक. (२५ ब्राह्मणगाव)
सटाणा-मालेगाव रस्त्यावरील खड्ड्यांनी वाहनधारक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 5:51 PM
ब्राह्मणगाव : गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने सटाणा-मालेगाव रस्त्यावर खड्डे पडल्याने दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना गाडी चालवताना कसरत करावी लागत आहे. संबंधित विभागाने त्वरित खड्डे बुजवावे, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.
ठळक मुद्दे दुचाकी चालकांना मात्र यातून मार्ग काढताना जिकिरीचे