ओझर : येथे गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाने सर्व्हिसरोड पूर्णपणे उखडून गेला असून, जागोजागी पडलेले जीव घेणे ठरत आहे. त्यामुळे कायमची उपाययोजना केव्हा होणार याची मागणी नागरिकांनी केली आहे.ओझर येथे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने सगळी वाहतूक सर्व्हिसरोडवरून सुरू आहे. त्याच्या वर्दळीने सगळा रस्ताच उखडून गेला असून, त्यात मोठे खड्डे पडले आहे. सर्व्हिसरोडवरील नव्याने रस्त्याचे मजबुतीकरण करत डांबरीकरण करावे. आजमितीस वाहनधारकांना बिकट झालेल्या खड्ड्यांचा सामना करताना नाकीनव येत आहे. या सर्व बाबींकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढून अनेकांचे नाहक जीव गेले आहे. सदर रस्ता त्वरित खड्डेमुक्त करावा, असे आवाहन ओझरकर नागरिकांनी केले आहे.यात्रा मैदान सायखेडा फाटा ते द्राक्षभवन, जुन्या गायखे पंपापासून ते मराठी शाळा, तर पुढे गडाख कॉर्नरच्या आसपास सर्व्हिसरोडवरून अवजड वाहतूक सुरू आहे. हा रस्ता पूर्णपणे खड्ड्यात गेला असून येथे आजपर्यंत अनेक जीव गेले, तर कित्येक वाहनधारकांना पाठीचे व मणक्याचे दुखणे सुरू झाले आहे. दरवेळी नागरिकांनी सदर रस्त्याबाबत तक्रार केल्यास तात्पुरती व वर वर मालपट्टी केली जाते, पण काही दिवसांत पुन्हा खड्डे पडतात. आता पावसाळादेखील संपल्याने हा रस्ता त्वरित दुरुस्त व्हावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
महामार्गावरील तात्पुरत्या मलमपट्टीने वाहनधारक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 9:50 PM
ओझर : येथे गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाने सर्व्हिसरोड पूर्णपणे उखडून गेला असून, जागोजागी पडलेले जीव घेणे ठरत आहे. त्यामुळे कायमची उपाययोजना केव्हा होणार याची मागणी नागरिकांनी केली आहे.
ठळक मुद्देटोल भरमसाठ असताना रस्ते खड्डेमुक्त हवे असल्याची मागणी