शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

वेग नियंत्रक बसवून वाहने नोंदणीस आणावीत

By admin | Published: January 16, 2016 11:05 PM

वेग नियंत्रक बसवून वाहने नोंदणीस आणावीत

’मालेगाव : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहन संवर्गात नोंदणीसाठी येणाऱ्या वाहनांना उत्पादकाने किंवा वाहन वितरकाने वेग नियंत्रक बसवून वाहने नोंदणीसाठी हजर करावीत, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुधाकर मोरे यांनी पत्रकान्वये कळविले आहे.मोरे यांनी म्हटले आहे की, केंद्रीय मोटार वाहन कलम १९८९ मधील नियम ११८च्या पोटनियम (१) मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. ज्या वाहतूक वाहनांची १ आॅक्टोबर २०१५ पूर्वी नोंदणी झालेली आहे. त्या वाहनांना वेग नियंत्रक बसविलेले नाही आणि जी वाहने या नियमामध्ये अंतर्भूत होत नाही, अशा वाहनांना १ एप्रिल २०१६ रोजी किंवा त्यापूर्वी वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार मानक एआयएस ०१८/२००१ नुसार पुढीलप्रमाणे कमाल पूर्वनिर्धारित वेग मर्यादेचा वेग नियंत्रक बसविला जाईल, असे महाराष्ट्र शासनाने अधिसूचनेनुसार कळविले आहे. केंद्र सरकारच्या १-१०-२०१५ रोजीच्या अधिसूचना एन-१, एम-२ संवर्गात नोंद झालेल्या वाहनांना वेग नियंत्रक बसविण्यापासून सूट दिली आहे. सर्व स्कूल बस (४० किमी), घातक वस्तू वाहून नेणारी परिवहन संवर्गातील वाहने (६० किमी), डंपर्स व ट्रॅक्टर्स (६० किमी) उपरोक्त नमूद नसलेली परिवहन संवर्गातील वाहने (८० किमी) अशी प्रतितास वेग मर्यादा ठरविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)