शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

घोटी-सिन्नर मार्गावर वाहनचालकाची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 4:09 PM

लुटारू फरार : डोळ्यात मिरची स्प्रे मारत अडीच लाख लंपास

ठळक मुद्देविनाक्र मांकाच्या सिल्वर रंगाच्या स्विफ्ट डिझायर वाहनाने स्कोडा वाहनाला आडवी लावून अडविले

घोटी : शिर्डीहून मुंबईला जाणाऱ्या दाम्पत्याला डोळ्यात मिरचीचा स्प्रे मारून लुटल्याची घटना रविवारी (दि.१६) मध्यरात्री घोटी-सिन्नर मार्गावर घडली.दरम्यान या घटनेची माहिती मिळताच घोटी पोलिसांनी रात्रभर तपास मोहीम राबविली मात्र आरोपी हाती लागले नाहीत. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ठाणे येथील सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी संजीत तुकाराम शेवाळे हे रविवारी रात्रीच्या सुमारास आपल्या पत्नीसह शिर्डीवरून दर्शन करून मुंबईला आपल्या (स्कोडा क्र मांक एम.एच.०४ जे.पी. ८०४५) वाहनाने मुंबईला परतत असताना देवळे शिवारातील ज्योती कारखान्याजवळ मागून येणा-या विनाक्र मांकाच्या सिल्वर रंगाच्या स्विफ्ट डिझायर वाहनाने स्कोडा वाहनाला आडवी लावून अडविले. डिझायर वाहनातून दोघा अनोळखी लुटारूंनी उतरून स्कोडा वाहनातील संजीत शेवाळे यांच्या डोळ्यात मीरचीचा स्प्रे मारून गाडीच्या मागच्या सीटवर ठेवलेली अडीच लाख रु पये असलेली पैशाची बॅग आणि जमिनीचे कागदपत्र घेऊन फरार झाले. दरम्यान हा प्रकार घडत असल्याचे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष लकी जाधव यांच्या निदर्शनाला आले. त्यांनी लुटारूच्या वाहनाला आपले वाहन आडवे लावले मात्र लुटारूनी लकी जाधव यांच्या वाहनालाही धडक देत पोबारा केला.या घटनेची माहिती नजीकच्या पेट्रोलपंप चालकाने घोटी पोलिसांना कळविली. घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, चालक नितीन भालेराव व पथकाने अवघ्या काही मिनिटात घटनास्थळी धाव घेतली.सदरचे लुटारू घोटी शहरातून कांचनगाव मार्गे गेले असल्याने पोलिसांनी पाठलाग केला .मात्र ते हाती लागू शकले नाहीत. दरम्यान पोलिसांनी नाकाबंदी करून रात्रभर तपास मोहीम राबविली. घटनेची माहीती समजताच पेठचे उपअधीक्षक सचिन गोरे,अतुल झेंडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपासाच्या सूचना दिल्या. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आंनद माळी करीत आहे.दरोड्याबाबत साशंकताघोटी सिन्नर मार्गावर झालेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली असून,यातील संजीव शेवाळे हे पोलीस कर्मचारी आहेत. त्यांनी शिर्डीवरून परतताना सिन्नर येथून एटीएम मधून अठरा हजार रु पये काढले असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.जर एटीएम असताना गाडीत अडीच लाख रु पये का ठेवले?असा प्रश्न पोलीसांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे शेवाळे हे पोलीस खात्यात असताना वादग्रस्त असल्याने त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली असून जमीन व्यवहारात त्यांच्यावर स्थानिक पातळीवर चौकशी चालू आल्याचे चौकशीत निष्पन्न झाले असल्याने हा दरोडा की बनाव याबाबत पोलीस तपास करीत आहे. मात्र चार दिवसात दोन रस्त्यावर दरोड्याचे प्रकार घडल्याने वाहनधारकांत घबराट पसरली आहे.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस