नाशिक : स्कूल बसेस, डंपर्स, टँकर्स, धोकादायक मालांची वाहतूक करणारी, तसेच १ आॅक्टोबर २०१५ नंतर उत्पादित करण्यात येणाऱ्या वाहनांना उत्पादकांकडून किंवा वितरकांकडून वेगनियंत्रक बसवून घेणे आवश्यक आहे़ ए.आय.एस. ०१८:२०१२ च्या मानकानुसार जास्तीत जास्त ६० कि.मी. प्रतितास वेग नियंत्रक बसवूनच वाहन उत्पादक, वाहन वितरकांनी वाहनधारकांना वाहने वितरित करावी, असे आवाहन परिवहन कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे़केंद्र शासनाने केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ च्या नियम ११८ मध्ये सुधारणा केली असून, त्यामध्ये या नवीन नियमाचा समावेश केला आहे़ या नियमानुसार मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम ४१(४) नुसार केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या आणि १ आॅक्टोबर २०१५ नंतर उत्पादित होणाऱ्या परिवहन वाहनांना उत्पादकांकडून उत्पादनाच्या वेळेस किंवा वितरकाकडून वितरणाच्या वेळेस वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार ए.आय.एस. ०१८:२०१२ च्या मानकाची पूर्तता करणारा जास्तीत जास्त ८० कि.मी. प्रतितास वेग निर्धारित केलेला वेगनियंत्रक बसविणे आवश्यक आहे.या नियमानुसार दुचाकी, तीनचाकी, क्वाड्री सायकल, अग्निशामक वाहने, रुग्णवाहिका, पोलीस विभागाची वाहने यांना वेगनियंत्रक बसविण्याची आवश्यकता नाही. तसेच प्रवासी व त्यांचे सामान वाहून नेण्यासाठी उपयोगात आणली जाणारी चारचाकी वाहने ज्यांची आसनक्षमता चालकासहीत आठपेक्षा जास्त नसेल आणि त्याचे एकूण स्थूल वजन ३५०० कि.ग्रॅ.पेक्षा जास्त नसेल, तसेच नियम १२६ मध्ये विहित केलेल्या तपासणी संस्थेने सत्यापित व प्रमाणित केलेल्या ज्याचा वेग ८०कि.मी. प्रतितासापेक्षा अधिक नसेल अशा वाहनांना वेगनियंत्रक बसविण्याची आवश्यकता नाही़ (प्रतिनिधी)
वाहनांसाठीची वेगमर्यादा ६० किलोमीटर
By admin | Published: October 19, 2015 10:25 PM