शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

मालेगावी महापौरपदाच्या हालचालींना वेग

By admin | Published: May 29, 2017 12:05 AM

आझादनगर : महापौरपदासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीकडून हालचालींना वेग दिला जात असला, तरी उद्या नगरसेवकांच्या नावांची राजपत्रात (गॅझेट) नोंद झाल्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहेत.

सय्यद रशीद । लोकमत न्यूज नेटवर्कआझादनगर : मालेगाव महानगरपालिकेच्या निकालानंतर महापौरपदासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीकडून हालचालींना वेग दिला जात असला, तरी उद्या नगरसेवकांच्या नावांची राजपत्रात (गॅझेट) नोंद झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने चित्र स्पष्ट होणार आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील बोलणीनंतर राष्ट्रवादीच्या उच्च स्तरावरून याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार माजी आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल यांना देण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. यामुळे सेनेला बरोबर घेत काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याची यशस्वी खेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून खेळण्यात येणार आहे. मात्र सेना-भाजपा मिळणे अपेक्षित आहे. अन्यथा मोठा पेच निर्माण होऊन मोठ्या प्रमाणावर ‘घोडेबाजार’ होण्याची शक्यता आहे. मनपा निकालात सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस समोर आला आहे. त्या खालोखाल राष्ट्रवादी-जनता दलाला २६ जागा मिळाल्या आहेत. संपूर्ण शहरातून एकमेव अपक्ष निवडून आलेल्या नगरसेवकाचाही राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा आहे. यामुळे दोन्ही पक्षांकडे जवळजवळ समान बलाबल असल्याने दोन्ही पक्षांकडून महापौरपदाच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांची वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू होती; मात्र काँग्रेसच्या गतवेळी मिळालेल्या अनुभवातून यंदा राष्ट्रवादीने सावध भूमिका घेत याबाबत निर्णय घेण्याचा सर्वाधिकार स्थानिक नेते मुफ्ती मोहंमद इस्माईल यांना दिल्याचे विश्वसनीयरीत्या समजले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सेना नेते राज्यमंत्री दादा भुसे यांच्याशी संपर्क साधून आहेत. सेना व राष्ट्रवादी मिळून ही संख्या ४० वर पोहोचली असून, बहुमतासाठी तीन नगरसेवकांची आवश्यकता असल्याने सत्तेची मदार एमआयएम व भाजपावर आहे; मात्र भाजपाचे स्थानिक पातळीवरील नेते हे कट्टर विरोधक आहेत, तर एमआयएमचा सेना व भाजपास सरळ पाठिंबा मिळणे शक्य नाही. किंबहुना मिळाले तरी ते विधानसभा निवडणुकीदरम्यान ‘गले की हड्डी’ बनू शकते. त्यामुळे राष्ट्रवादीसमोर एमआयएम किंवा भाजपाचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पाठिंबा मिळविणे किंवा आपला सहविचारी पक्ष काँग्रेसशी हात मिळविणे याशिवाय पर्याय नसल्याची चिन्हे दिसत आहेत. काँग्रेस पक्षाकडूनही वरिष्ठांकरवी राष्ट्रवादीबरोबर घरोबा करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र त्यास यश मिळत नसल्याचे पाहून येत्या एक-दोन दिवसातच काँग्रेसकडून राजकीय डावपेच खेळण्यास सुरुवात होणार असल्याचे कळते.  स्थानिक पातळीवरील एकमेकांशी झालेला ‘कट्टर’ विरोध पाहता दोन्ही पक्षांना कुणाबरोबर जायचे याचा विचार करावा लागणार आहे. कारण सध्या पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मूडही लक्षात घेणे गरजेचे आहे. कारण दोन्ही पक्षांना येत्या विधानसभा निवडणुकीचा विचार करावा लागणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांसाठी महापौरपदाचा जादूई आकडा पार करण्यासाठी मोठी कसोटी लागणार आहे, नाही तर एका अग्निपरीक्षेतून पास व्हावे लागणार आहे.मालेगाव महापौरपदाच्या हालचाली गतिमान झाल्या असल्या तरी दोन्ही प्रमुख पक्षांसमोर मनपात आलेल्या छोट्या पक्षांतील स्थानिक पातळीवरील नेते ‘कट्टर’ विरोधक असल्याने ही दोन्ही पक्षांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. किंबहुना राजकारणात कधीही काहीही होऊ शकते असे तत्त्व प्रत्यक्षात आले तरी राकॉँचे महापौर हाजी मोहंमद इब्राहीम, कॉँग्रेसचे गटनेते हाजी खालीद शेख व एमआयएमचे शहराध्यक्ष व माजी महापौर मालिक शेख या तिन्ही मातब्बरांना घरी बसवून शहरातील जनतेने सूचक इशारा तीनही पक्षांना दिला आहे. त्यामुळे सगळ्याच पक्षांना आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा जनता जनार्दनाच्या दरबारात हाजीर व्हावे लागणार असल्याचे भान ठेवूनच महापौरपदासाठी इतर पक्षांशी हातमिळवणी करावी लागणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांच्या नेत्यांना अग्निपरीक्षेतून जावे लागणार आहे.