पांडाणे : दिंडोरी तालुक्यात मान्सूनपूर्व शेतीकामांना वेग आला असून, बळीराजाचे पावसाकडे लक्ष लागले आहे.दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात भात, नागली, वरई, उडीद आदी पिके घेतली जातात. ही पिके घेण्यापूर्वी शेतजमिनीची भाजवण करून नांगरणी व वखरणी केली जाते. मे महिन्यात रोहिणी नक्षत्रावर भात व नागलीची पेरणी केली जाते.जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सूला सुरुवात होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून, बळीराजा मशागतीला लागला आहे.
मान्सूनपूर्व शेतीकामांना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 6:44 PM