वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यात मान्सूनला वेळेत सुरवात झाल्याने व भात लावणीच्या रोपांना समाधान कारक पाऊस झाल्याने तालुक्यातील वेळुंजे येथे भात लावणीस चांगली सुरवात झाली आहे.गेल्या तीन ते साडेतीन महिन्यापासून ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होत नव्हता, त्यामुळे मुजुर वर्गाची चांगली तारांबळ उडत होती, परंतु आता भात लावणीस सुरवात झाल्याने मुजुर वर्गात समाधान व्यक्त करीत आहेत.कोरोनोच्या महाभयंकर महामारीतून काम धंद्यासाठी शहरात जायला ग्रामीण भागातून मजूर वर्ग तयार होत नव्हता, त्यामुळे मजूर कुटुंबावर मोठे संकट उभे राहिले होते. आता गावातच रोजगार मिळणार आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सर्वाधिक भात, नागली, वरई सारखे प्रमुख पिके घेतली जातात, ऐन अवणीच्या वेळी मजूर मिळणे कठीण असते.शेतात भात लावणीस सुरवात झाली. त्यामुळे मजुरांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापुढे किमान दोन महिने भात लावणीसाठी रोजगार उपलब्ध होणार आहे.तीन महिन्यापासून रोजगार नव्हता परंतु पाऊस वेळेत पडल्याने भात लावणीस सुरवात झाली. त्यामुळे काम मिळू लागल्याने हाती दोन पैसे मिळतील. कोरोनमुळे कुठेच जाता येत नव्हते. कामधंदे सर्व बंद होते. त्यामुळे रोजगार मिळत नव्हता, आता किमान तीन महिने रोजगार मिळणार आहे. त्याचे कनक्कीच समाधान आहे.- दशरथ काशीद, मजूर.
वेळुंजे भात लावणीस सुरवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 6:40 PM
वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यात मान्सूनला वेळेत सुरवात झाल्याने व भात लावणीच्या रोपांना समाधान कारक पाऊस झाल्याने तालुक्यातील वेळुंजे येथे भात लावणीस चांगली सुरवात झाली आहे.
ठळक मुद्देकोरोनोच्या काळात ग्रामीण भागात रोजगाराला मिळाली चालना