इंदिरानगर : परिसरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात विक्रेत्यांचे अतिक्र मण झाल्याने अपघात वाढले आहे. विशेषत: शिवाजीवाडी व भारतनगरमधून गेलेला रस्त्याच्या दुतर्फा पुन्हा अतिक्र मण वाढण्यास सुरु वात झाल्याने रोज छोटे-मोठे अपघात होते आहेत. मनपाच्या वतीने अतिक्र मण हटवूनदेखील परिस्थिती कायम आहे.परिसरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यावरच गेल्या दोन-तीन वर्षांत अतिक्र मण झाल्याने अपघात वाढले आहे. शिवाजीवाडी व भारतनगर भागात तर रस्त्याच्या दुतर्फा अतिक्र मण सुरु वात झाल्याने परिस्थिती ‘जैसे थे’च झाली आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाढत चाललेल्या अतिक्र मणांमुळे वाहतुकीस अडथळा होत असल्याची तक्र ार त्रस्त नागरिकांनी केली आहे.पुणे महामार्ग आणि मुंबई महामार्गास जवळचा मार्ग म्हणून अशोकामार्ग वडाळा-पाथर्डी रस्ता शिवाजीवाडी भारतनगर या मार्गे रस्ता तयार करण्यात आला. परंतु शिवाजीवाडी व भारतनगरमधून जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत झोपड्या असल्याने रस्त्याचे रु ंदीकरण आणि डांबरीकरण रखडले होते. सुमारे पाच ते सहा महिन्यांपूर्वी अतिक्र मण विभागाने पोलिसांचा फौजफाटा घेऊन रस्त्याच्या दुतर्फा असलेले अनधिकृत झोपड्या हटविल्यामुळे वाहतुकीस रस्ता मोकळा होईल, असे वाटत होते.परंतु भारतनगर येथील घरकुल योजनेपासून ते मुंबई महामार्गापर्यंत अद्यापपर्यंत रस्त्यांचे रुं दीकरण आणि डांबरीकरण रखडले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यातच या रस्त्याच्या दुतर्फा पुन्हा अतिक्र मणाची परिस्थिती ‘जैसे थे’च होत चालल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या आत अतिक्र मण मोहीम राबविण्याची मागणी त्रस्त वाहनधारकांनी केली आहे. अन्यथा अपघातात वाढ होत राहतील असेही नागरिकांनी सांगितले़मुंबई महामार्ग आणि पुणे महामार्गास जवळचा मार्ग असल्याने इंदिरानगर परिसरातील मुख्य रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात रात्रंदिवस रहदारी असते. विविध उपनगरला ये-जा करण्यासाठी कामगार व कर्मचाऱ्यांसाठी जवळचा मार्ग असल्याने दिवसभर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते.परिसरातील लहान बालके सर्रासपणे रस्त्यावर खेळत असल्याने नियमित लहान-मोठे अपघातून हाणामारीच्या घटना घडतात.
मुख्य रस्त्यावरच विक्रेत्यांचे अतिक्र मण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:41 AM