लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शिवसेनेला जागा न सुटल्याने नाशिक पश्चिममध्ये तिघा इच्छुकांनी बंडखोरी केली असून, या नाराजांचे बंड शमविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. सोमवारी (दि.७) माघारीची अंतिम मुदत असून, त्या पार्श्वभूमीवर नाराजांचे अर्ज माघार घेण्यासाठी शिवसेनेचे संपर्कप्रमुख नाशकात दाखल होणार आहेत.भाजप आणि शिवसेना युतीत नाशिक पश्चिम या जागेचा जिल्ह्याच्या दृष्टीने अडसर होता. प्रत्यक्षात जिल्ह्यात एकाही जागेची अदलाबदल झाली नाही. त्यामुळे विशेष करून नाशिक पश्चिम मतदारसंघातील इच्छुक तसेच नगरसेवक नाराज झाले आहेत. त्यांनी दोन ते तीन दिवसांपासून बंडाचे निशाण फडकावले असून, शिवसेना कार्यालयाच्या बाहेरच निदर्शने केली; परंतु त्यानंतरदेखील मतदारसंघ भाजपकडून मिळण्याची चिन्हे नाहीत व पक्षाकडून तसे संकेतही मिळालेले नाहीत. त्यामुळे शिवसेनेच्या तिघा बंडखोरांनी अर्ज दाखल केले आहेत.वरिष्ठ पातळीवर बंड थंड करण्याची भाषा नेते करीत असले तरी स्थानिक स्तरावर मात्र तसे होताना दिसत नाही. अर्थात, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी हे सोमवारी (दि.७) नाशिकमध्ये येऊन पक्षादेशानुसार नाराजांना अर्ज मागे घेण्यास सांगणार असल्याची माहिती दिली.
नाशिक पश्चिमचा तिढा कायम, आज फैसला होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2019 12:34 AM
नाशिक : शिवसेनेला जागा न सुटल्याने नाशिक पश्चिममध्ये तिघा इच्छुकांनी बंडखोरी केली असून, या नाराजांचे बंड शमविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. सोमवारी (दि.७) माघारीची अंतिम मुदत असून, त्या पार्श्वभूमीवर नाराजांचे अर्ज माघार घेण्यासाठी शिवसेनेचे संपर्कप्रमुख नाशकात दाखल होणार आहेत.
ठळक मुद्देप्रत्यक्षात जिल्ह्यात एकाही जागेची अदलाबदल झाली नाही.