नाशिक : अकरावी प्रवेशप्रक्रियेत आतापर्यंत सुमारे २५ हजार ६८६ विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्जाचा भाग एक भरला असून, त्यापैकी सुमारे २२ हजार विद्यार्थ्यांनी त्यांच्या आॅनलाइन अर्जाची संबंधित शाळा अथवा मार्गदर्शन केंद्रातून पडताळणी करून घेतली आहे. तर सुमारे १९ हजार १५४ विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्जाचा भाग दोन भरून त्याची प्रिंटआऊटही काढली आहे. दरम्यान, अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेत प्रारंभी राबविल्या जाणाऱ्या बायोफोकल शाखेच्या प्रवेसासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून, या शाखेसाठी केवळ ३५५ अर्ज प्राप्त झाले आहेत.राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातून दहावी उत्तीर्ण झालेल्या २५ हजार ६८६ विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी अर्जाचा भाग एक भरला आहे. यातील २१ हजार ८८७ विद्यार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी झाली आहे. तर १९ हजार १५४ विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग दोन भरला असून, त्यातील १८ हजार ९१८ अर्जांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर वादात सापडलेल्या आयसीएसई बोर्डातून उत्तीर्ण झालेल्या ६७० विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले असून, वेळापत्रकानुसार १ जुलैला विद्यार्थ्यांना आपला आॅनलाइन अर्ज त्यांच्या संकेतस्थळावर पुनर्पडताळणीसाठी उपलब्ध होणार असून, विद्यार्थ्यांना त्यांच्या अर्जाची बारकाईने तपासणी करून काही चुका अथवा उणिवा राहिल्या असल्यास त्या २ व ३ जुलैला दुरुस्त करण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर ६ जुलैला पहिली प्रारुप गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार असून, ८ ते १० जुलै दरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करता येणार आहे...या निर्णयाचा विद्यार्थ्यांना फायदायावर्षी प्रवेशप्रक्रियेत आयसीएसईच्या विद्यार्थ्यांचे अनुक्रमे पहिल्या पाच विषयांचे सरासरी गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यामुळे आयसीएसई बोर्डातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणांची पुनर्पडताळणी करावी लागत असून, अशा एकूण ६७० विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. शिक्षण विभागाने ऐनवेळी घेतलेल्या या निर्णयाचा अकरावी प्रवेशासाठी राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
२२ हजार आॅनलाइन अर्जांची पडताळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:48 AM