नाशिक : जुलै २०१९ मध्ये तलाठी पदासाठी झालेल्या परीक्षेच्या निकालानंतर सुमारे दोन महिन्यांनी जाहीर झालेल्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी सोमवार, दि. १७ पासून सुरू होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय आवारात या पडताळणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकार कक्षेत येणाºया तलाठी पदासाठी जुलै २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या आॅनलाइन परीक्षेच्या निकालानंतर तब्बल दोन महिन्यांनी प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली. जिल्ह्यातील ८३ जागांसाठी सुमारे २२ हजार उमेदवारांनी तलाठी पदाची परीक्षा दिली होती. त्यामुळे अंतिम यादी केव्हा जाहीर होणार याविषयी उमेदवारांमध्ये उत्सुकता होती. गेल्यावर्षी मार्च महिन्यात तलाठी पदाच्या ८३ जागांसाठी जाहिरात निघाल्याने तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. जिल्ह्यातील ही सर्वात मोठी भरती असल्यामुळे भरभरून अर्ज दाखल करण्यात आले. सुमारे २२,८५३ तरुणांनी तलाठी पदाची परीक्षा दिली.पेसा क्षेत्राबाहेरील ६१ जागांसाठी १८ हजार ९७१ उमेदवारांनी परीक्षा दिली होती, तर पेसा क्षेत्रातील २२ जागांसाठी ४१५६ तरुणांनी आॅनलाइन परीक्षा दिली होती. २ ते २६ जुलै २०१९ अशी सुमारे २४ दिवस उमेदवारांची शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती. महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून परीक्षा घेण्यात आली. ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली होती त्यांनी मिळविलेल्या गुणांची माहिती महापोर्टल संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली होती.तलाठी पदासाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रतीक्षा यादीनंतर हरकतीसाठी मुदत देण्यात आली होती.यासंदर्भातील कोणतीही हरकत आली नसल्याने यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीचा र्कायक्रम हाती घेण्यात आला आहे. सोमवार, दि. १७ आणि मंगळवार, दि. १८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे.एसएमएसद्वारे कळविलेउमेदवारांना याबाबतची माहिती लघुसंदेशद्वारे कळविण्यात आलेली आहेच, शिवाय स्पीड पोस्टाद्वारेदेखील माहिती कळविण्यात आलेली आहे. उमेदवारांनी सकाळपासून या मोहिमेस उपस्थित राहून कागदपत्रांची पडताळणी करवून घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
कागदपत्रांची आजपासून पडताळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 1:29 AM
जुलै २०१९ मध्ये तलाठी पदासाठी झालेल्या परीक्षेच्या निकालानंतर सुमारे दोन महिन्यांनी जाहीर झालेल्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी सोमवार, दि. १७ पासून सुरू होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय आवारात या पडताळणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
ठळक मुद्देतलाठी पदासाठी प्रक्रिया सुरू : सुमारे अडीचशे उमेदवारांची नावे