नाशिक : ओला आणि सुका कचºयाचे वर्गीकरण करून न देणारे तसेच प्लॅस्टिक बंदी असतानाही बॅगचा वापर करणाºयांवर १ एप्रिलपासून कारवाई करण्याचे जाहीर करणाºया महापालिकेने कोणालाही एप्रिल फूल न करता खरोखरीच कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे. पहिल्याच दिवशी दोन्ही प्रकारचे नियमभंग करणाºयांवर करवाई करीत तब्बल लाखाहून अधिक रक्कम वसूल करीत महापालिका लखपती झाली आहे. गेल्या गुढीपाडव्याला राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने सर्व प्रकारच्या प्लॅस्टिक उत्पादने आणि प्लॅस्टिकच्या बॅग तसेच अविघटनकारी तत्सम साहित्यावर बंदी घातली आहे. यात प्लॅस्टिक उद्योग आणि वितरकांंना त्यांच्याकडील साठा नष्ट करण्यासाठी महिनाभराची मुदत देण्यात आली असल्याने त्यांना वगळून महापालिकेने बाजारात प्लॅस्टिकच्या कॅरिबॅगचा वापर करणाºयांवर १ एप्रिलपासून कारवाई करणार असल्याचे जाहीर केले होते. त्याचबरोबर घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम २०१६ तसेच महाराष्टÑ महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार ओला व सुका कचरा याप्रमाणे वर्गीकरण न करणाºया नाशिक महापालिका कार्यक्षेत्रातील एकूण ८९ नागरिक आणि व्यावसायिकांवरदेखील १ एप्रिलपासून कारवाई करण्याचे जाहीर केले होते. नेमका याच दिवशी रविवार असल्याने पहिल्या दिवशी महापालिका कोणतीच कारवाई करणार नाही आणि दोन-तीन दिवसांनंतर कारवाई होईल, असा अंदाज बांधलेल्या नागरिक तसेच विक्रेत्यांचा भ्रमनिरास झाला.कॅरिबॅगऐवजी दोन डब्यात ठेवा कचराओला आणि सुका कचºयाचे वर्गीकरण करून तो महापालिकेच्या घंटागाडीत द्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत होते. त्यात ओल्या कचºयासाठी हिरव्या, तर सुक्या कचºयासाठी निळ्या रंगाची प्लॅस्टिकची पिशवी वापरावी असे सुचित केले जात होते. आता गुढीपाढव्यापासून प्लॅस्टिक कॅरिबॅगला बंदी घालण्यात आल्याने कचरा कसा संकलित करावा? असा प्रश्न निर्माण झाला आहे, बहुतांशी नागरिक डस्बीन बॅग म्हणून मिळणाºया पातळ प्लॅस्टिक पिशव्या तसेच अन्य कॅरिबॅगचा वापर करीत. मात्र, आता प्लॅस्टिक कॅरिबॅग बंद झाल्याने महापालिकेने कॅरिबॅग ऐवजी कोणत्याही डबे, पोते अशा पर्यायी साहित्यात कचरा संकलित करून ठेवावा आणि तो महापालिकेच्या घंटागाडीत टाकावा, असे आवाहन केले आहे.
पहिल्याच दिवशी मनपा लखपती : नियम भंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई एप्रिल फूल नव्हे फुल्ल कारवाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 1:20 AM
नाशिक : ओला आणि सुका कचºयाचे वर्गीकरण करून न देणारे तसेच प्लॅस्टिक बंदी असतानाही बॅगचा वापर करणाºयांवर १ एप्रिलपासून कारवाई करण्याचे जाहीर करणाºया महापालिकेने कोणालाही एप्रिल फूल न करता खरोखरीच कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे.
ठळक मुद्देअविघटनकारी तत्सम साहित्यावर बंदी घातली आहेअंदाज बांधलेल्या नागरिक तसेच विक्रेत्यांचा भ्रमनिरास