शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

ज्येष्ठ रंगकर्मी नेताजी भोईर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 12:06 AM

नाशिक : गेल्या पाच दशकांहून अधिक काळ मराठी रंगभूमीवर लेखन, नेपथ्य, अभिनय, लोककला यामध्ये मुशाफिरी करणारे ज्येष्ठ रंगकर्मी, नाटककार आणि मूर्तिकार नेताजी आबाजी भोईर यांचे बुधवारी (दि. ९) पहाटेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. दुपारी पंचवटी अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ठळक मुद्देनाट्यक्षेत्रावर शोककळा : नव्वदाव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास१५ मे रोजी शोकसभा

नाशिक : गेल्या पाच दशकांहून अधिक काळ मराठी रंगभूमीवर लेखन, नेपथ्य, अभिनय, लोककला यामध्ये मुशाफिरी करणारे ज्येष्ठ रंगकर्मी, नाटककार आणि मूर्तिकार नेताजी आबाजी भोईर यांचे बुधवारी (दि. ९) पहाटेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. दुपारी पंचवटी अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.नेताजी भोईर यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. गेल्या काही महिन्यांपासून नेताजी आजारी होते. त्यामुळे त्यांचा सार्वजनिक सहभागही कमी झाला होता. बुधवारी पहाटे ५.१५ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे सुपुत्र सुरेश यांनी नेताजींच्या पार्थिवाला अग्निडाग दिला. त्यांच्या अंत्ययात्रेला नाट्य व कला क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पंचवटीतील पाथरवट गल्लीत आयुष्य घालविलेल्या नेताजी तथा दादांना नाट्यकलेचे धडे घरातूनच मिळाले होते. त्यांचे काका गजाननराव आणि बजूराव हेसुद्धा नाटकात कामे करायचे. ‘संगीत भक्त दामाजी’ या नाटकात एक बालकलाकार म्हणून त्यांच्या रंगभूमीवरील प्रवासाला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी राजपूत ऐक्य मंडळाच्या माध्यमातून अनेक नाटकांमध्ये भूमिका साकारल्या. प्रसंगी स्त्री भूमिकाही त्यांना कराव्या लागल्या.  ‘उमाजी नाईक’ या नाटकात ते जिजाबाईची भूमिका करायचे. १५ आॅगस्ट १९४८ रोजी त्यांनी विजय नाट्य मंडळाची स्थापना केली आणि मंडळाच्या माध्यमातून त्यांनी सलग पन्नास वर्षे महाराष्टÑ शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने भरविण्यात येणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेत नाटके सादर करत एक विक्रम नोंदविला. स्वत: संहिता लिहायची, स्वत:च दिग्दर्शन करायचे, स्वत:च नेपथ्यकाराची भूमिका निभवायची आणि प्रसंगी अभिनयही वठवायचा. अशी चौफेर कामगिरी बजावणारा हा अवलिया कलाकार वयाच्या नव्वदीतही रंगभूमीशी आपले नाते टिकवून होता. हौशी रंगभूमीवर नवोदितांना रंगमंच मिळवून देण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले. त्यामुळे, हौशी कलावंतांसाठी नेताजी नेहमीच आधारवड राहिले. नेताजी स्वत: मूर्तिकार व नेपथ्यकार असल्याने त्यांच्या नाटकाचे भव्य-दिव्य नेपथ्य नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण असायचे. रंगमंचावर सायकल आणि बुलेट चालविण्यासारखे अभिनव प्रयोगही आकर्षण असायचे. प्रशांत सुभेदारसह अनेक कलावंत त्यांनी रंगभूमीला दिले. ‘लाल कंदील’, ‘रामराज्य’, ‘अंतरी’, ‘काळाच्या पंज्यातून’, ‘जागं व्हा रे जागं व्हा’ आदी त्यांनी लिहिलेली नाटके गाजली. अनेक नाटकांना पारितोषिकेही मिळाली. जेमतेम आठवीपर्यंत शिकलेल्या नेताजींनी रंगभूमीवर लीलया वावरतानाच मूर्तीकलेतही स्वत:ची प्रतिमा निर्माण केली होती. गणेशोत्सवात दाखविण्यात येणाºया आराशीसाठी ते वेगवेगळ्या विषयांवर मूर्तीकाम करायचे. त्यांच्या देखाव्यांना राज्यभरातून मागणी असायची. त्यांचा स्वत:चा विजय ब्रास बॅण्डही होता. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्षपद त्यांनी काही वर्षे भूषविले होते. शिवाय, विविध संस्थांशी त्यांचा निकटचा स्नेह होता. रंगभूमीवरील कारकिर्दीबाबत त्यांना अनेक मान-सन्मान प्राप्त झाले. नाट्य परिषदेच्या वतीनेही त्यांना जीवनगौरव, बाबुराव सावंत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. वयाच्या ८०व्या वर्षी नाशिककरांच्या वतीने त्यांचा जाहीर नागरी सत्कारही करण्यात आला होता. मागील वर्षी झालेल्या राज्य नाट्य स्पर्धेत त्यांनी सादर केलेले ‘हे रंग जीवनाचे’ हे त्यांचे अखेरचे नाटक ठरले. रंगभूमी आणि मूर्तीकलेतील एक दादा माणूस गेल्याने नाशिककरांवर शोककळा पसरली आहे.१५ मे रोजी शोकसभादिवंगत रंगकर्मी नेताजी भोईर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सार्वजनिक वाचनालय, अखिल भारतीय नाट्य परिषदेची नाशिक शाखा आणि विविध संस्थांच्या वतीने येत्या १५ मे रोजी सायंकाळी ६ वाजता प. सा. नाट्यगृहात शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. चेहºयाला मेकअप करून निरोपआयुष्यभर चेहºयाला मेकअप करून रंगभूमी वर वावरणाºया नेताजी यांच्या इच्छेनुसार, अंत्यविधीप्रसंगी त्यांच्या चेहºयाला मेकअप करण्यात येऊनच अंतिम निरोप देण्यात आला. रंगभूषाकार एन.ललित यांनी मेकअप केला. आपण रंगभूमीवर एक रंगकर्मी म्हणून जगलो आणि अंतिम समयीही एक रंगकर्मी म्हणूनच आपल्याला निरोप द्यावा, अशी इच्छा नेताजींनी आपल्या कुटुंबीयांकडे प्रदर्शित करून ठेवली होती.