नाशिक : फॅमिली फिजिशियन्स असोसिएशनच्या वतीने शहरातील डॉक्टरांसाठी दोनदिवसीय कार्यशाळा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांच्या उपस्थितीत पार पडली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी आडके या होत्या. प्रारंभी संघटनेच्या अध्यक्ष डॉ. स्मिता कंचनकुमार कांबळे यांनी संस्थेने केलेल्या कार्याचा आढावा सादर केला व सुसंवाद या स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. वैद्यकीय व्यवसायातील सेवाज्येष्ठता लक्षात घेता डॉ. श्यामसुंदर काबरे, डॉ. विजय थेटे, डॉ. शरद पाटील यांना ‘जीवन गौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यशाळेत डॉ. राज नगरकर यांच्यासह नाशिक, पुणे व औरंगाबाद येथील विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजय मुंदडा, डॉ. शीतल सरजसे यांनी केली, तर आभार डॉ. प्रमोद अहेर यांनी मानले. याप्रसंगी डॉ. प्रतिभा जोशी, डॉ. प्रदीप गवळी, अविनाश पवार, तेजू सोलोमन, गुलाब घरटे, बी. बी. देशमुख, अभय शुक्ला यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.
ज्येष्ठ डॉक्टरांना ‘जीवनगौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 12:54 AM