सिन्नर : आयुष्यभर सांभाळलेली संसाराची जबाबदारी पुढच्या पिढीवर सोपवून उर्वरित आयुष्य समवयस्कांसोबत हसत-खेळत जावे, यासाठी भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघाने तळ्यातील भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात सहल, वनभोजन व आनंदमेळ्याचे आयोजन केले होते.ज्येष्ठांना सतत आनंदी ठेवण्याच्या उद्देशाने ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक मु. शं. गोळेसर आणि लायन्स क्लब आॅफ सिन्नर सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठांनी देहभान अन् वय विसरून विविध स्पर्धांचा आनंद लुटला. त्र्यंबकबाबा भगत, लायन्सचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय गडाख, कृष्णाजी भगत, हेमंत वाजे यांच्या हस्ते बक्षिसे वाटण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मु. शं. गोळेसर, चंद्रभान दातीर, हिरालाल कोकाटे, रघुनाथ सोनार, अशोक मुत्रक, भानुदास माळी, दत्तात्रय ढोली यांनी परिश्रम घेतले.
देहभान विसरुन ज्येष्ठांनी अनुभवले ‘रम्य ते बालपण’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 11:46 PM