शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

चणकापूरमधून विसर्ग

By admin | Published: February 18, 2016 10:24 PM

दिलासा : भेंडी, मानूर, देवळा, रामेश्वर धरण भरणार

कळवण : चणकापूर धरणातून आज, गुरुवारी सकाळी उजव्या कालव्यात बिगर सिंचनासाठी ८० क्यूसेस पाणी सोडण्यात आले. यामुळे कळवण आणि देवळा तालुक्यातील काही गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. १९० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त झाल्यानंतर मालेगाव पाटबंधारे विभागाने पाणी सोडले. या पाण्याची चोरी होणार नाही यासाठी कोल्हापूर फाटा आणि देवळा येथील चणकापूर उजवा कालवा उपविभागाची यंत्रणा लक्ष ठेवून असणार आहे.कालवा वहन क्षमता वाढवून १०० किंवा १२० क्यूसेसने कालवा चालवावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. १४ दिवस पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाला चणकापूर उजव्या कालव्यावर तैनात राहण्याच्या सूचना दिल्या असून, पाणीचोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. चणकापूर उजव्या कालव्याला पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी दिल्यानंतर बुधवारी पाणी सुटेल, असा विश्वास पाटबंधारे विभागाने दिला होता. मात्र बुधवारी पाणी न सुटल्याने शेतकरी बांधवांमध्ये खळबळ उडाली होती. पाटबंधारे विभागाने मालेगावी पाण्याबाबत बैठक असल्याचे सांगून वेळ मारून नेली. जिल्हाधिकारी कुशावह यांचे पाणी सोडण्याचे आदेश असताना मालेगावी पाण्याबाबत झालेल्या बैठकीबाबत आश्चर्य व्यक्त केले जात होते. कालव्याला १९० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचे आदेश दिले. या पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सोडण्यास मदत होणार आहे. (वार्ताहर)