शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
2
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
3
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
4
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
5
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
6
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
7
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
8
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
9
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
10
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
11
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
12
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
13
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
14
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
15
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
16
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
17
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
18
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
19
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
20
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान

अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूक गुरुवारी

By admin | Published: March 13, 2016 12:16 AM

जिल्हा मजूर संघ : अध्यक्ष पदासाठी सकाळे, मुळाणे आघाडीवर

नाशिक : जिल्हा मजूर सहकारी संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, येत्या गुरुवारी (दि.१७) सकाळी १० वाजेपासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.विभागीय उप सहनिबंधक सतीश खरे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कार्यरत राहणार असून, तिडके कॉलनी येथील जिल्हा मजूर संघाच्या सहकार भवन येथे ही निवडणूक होईल. निवडणुकीचा कार्यक्रम असा - सकाळी १०वाजता मजूर संघाच्या उपस्थित मतदारांच्या स्वाक्षऱ्या इतिवृत्तावर घेणे, दहा ते सव्वादहा अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांसाठी नामनिर्देशन पत्रे वाटप करणे व स्वीकृती, १०.३० ते १०.४५ नामनिर्देशन पत्र छाननी, १०.४५ ते ११.०० उमेदवारी अर्ज माघारी घेणे, ११.०० ते ११.१५ आवश्यकता भासल्यास मतदान व नंतर आवश्यकता असल्यास मतमोजणी निवडणूक कार्यक्रम राहणार आहे.पाच वर्षांत पाच अध्यक्ष व उपाध्यक्ष होण्याची परंपरा कायम राहणार असून, पहिल्या वर्षी अनुभवी संचालक म्हणून संपतराव सकाळे व प्रमोद मुळाणे यांच्या नावांवर एकमत होण्याची शक्यता आहे. मागील काळातील केवळ पाच संचालक निवडून आले असून, त्यातही संपतराव सकाळे व शिवाजी रौंदळ हे दोनच संचालक बिनविरोध निवडून आले आहेत, तर अन्य तीन संचालकांना निवडणुकीला सामोरे जावे लागले आता संचालक मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेचच जिल्हा मजूर संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडीसाठी लॉबिंग सुरू झाले आहे. मागील काळातील अनुभव आणि सर्वांना सोबत घेऊन कामकाज करण्याची पद्धत पाहता मागील काळात अध्यक्ष पदाची काहीशा अल्प प्रमाणात धुरा सांभाळलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडू शकते. कारण मजूर संघाच्या अध्यक्षपदी असतानाच त्यांची जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांना अध्यक्षपद सोडावे लागले होते. दुसरे म्हणजे अध्यक्ष पदाने मागील पाच वर्षात हुलकावणी दिल्याने प्रमोद मुळाणे यांच्याविषयी काही संचालकांना सहानुभूती आहे. त्यामुळे त्यांचेही नाव अध्यक्षपदाच्या चर्चेत आहे. उपाध्यक्ष पदासाठी मात्र मागील कार्यकाळात तिघांना संधी मिळते की नवीन चेहऱ्याला पॅनलचे नेते राजेंद्र भोसले, केदा अहेर, दिलीप पाटील, शिवाजी रौंदळ हे संधी देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (प्रतिनिधी)