पेठ : देशातील प्रत्येक गाव-खेडे रस्त्यांनी जोडले गेले पाहिजे या उदात्त हेतूने दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या संकल्पनेतून प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यान्वित करण्यात आली. याचा सर्वाधिक लाभ पेठ तालुक्यातील वाड्या-वस्त्यांना झाला. मात्र त्यानंतरच्या काळात देखभाल व दुरुस्ती अभावी या रस्त्यांची दयनिय झाल्याने सद्य:स्थितीत तालुक्यातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था आहे. यात वाहनांचा प्रथम बळी जात आहे.स्थळ - पाहूची बारी रस्ता ( फोटो -08 सप्टेंबरपेठ 03)पेठहून सायंकाळी सुटणारी पेठ-पाहूची बारी ही शेवटची लांब पल्ल्याची बस. सर्व खासगी वाहने निघून गेल्यावर अंबापूर, कोपुर्ली, खिरकडे, तिर्ढ, जोगमोडी, माळेगाव, म्हसगण, आंबे यासह २० ते २५ गावांसाठी ही शेवटची बस. थांब्यांची संख्या जास्त असल्याने कधी कधी पाहूची बारीला पोहोचायला या बसला रात्री १० वाजतात. त्यातच काही दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास जागमोडी जवळ ही बस पंक्चर झाल्याने अंधारात प्रवाशांना ताटकळून रहावे लागले. गाडीत अनेक महिला व शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याने तासन् तास खोळंबा होत असल्याने याचे सर्व खापर खड्डेयुक्त रस्त्यांवर येऊन फुटते. अनेक प्रवाशांना मुख्य रस्त्यावर उतरून चार ते पाच किमी पायी जावे लागते.गाडीत बसा... पण नाशिक पोहोचेलच असे नाहीमहाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची तर अतिशय दयनिय अवस्था झाली आहे. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे रस्त्याचे रु ंदीकरण सुरू असताना पर्यायी रस्तेच नसल्याने वाहनधारकांना खड्डे व गाळातून कसरत करत मार्गक्र मण करण्याची वेळ आली आहे. याचाही सर्वाधिक त्रास लालपरीलाच सहन करावा लागत आहे. पेठ आगारातून सुटणारी नाशिक बस नाशिकला पोहोचेल की नाही याची धास्ती प्रवाशांना असते. पेठ ते नाशिक या ५५ किमी अंतरात दररोज दोन तरी बसेस नादुरु स्त होऊन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दिसतात. म्हणजे बसमध्ये बसा, तिकिटाचे पैसेही द्या मात्र तुम्ही नाशिकला पोहोचालच याची खात्री नाही. त्यातच बºयाच ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू असल्याने वाहनधारकांमध्ये खटके उडण्याचे प्रसंग घडत आहेत.
खड्डेयुक्त रस्ते घेतोत लालपरीचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 6:30 PM