ममदापूर : येवला तालुक्यातील ममदापूर परिसरात शेतकरी विजेमुळे त्रस्त झाला आहे. विद्युतवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना कुठलेही गांभीर्य नसल्याने शेतकरी वर्गात कमालीची अस्वस्थता पसरली आहे.या परिसरात पाऊस कमी असल्याने विहिरींनादेखील पाणी कमी आहे. तरीदेखील गुडघे वस्तीवरील डीपी गेल्या दहा दिवसांत तीन वेळेस जळाल्याने शेतकरी हैराण झाले आहे. सुरुवातीला डीपी जळाल्याने शेतकऱ्यांनी मनमाड येथून डीपी आणली; परंतु दोनच दिवसांत सदर डीपी जळाली. त्यानंतर शेतकऱ्यांनी वर्गणी काढून पुन्हा मनमाड येथून डीपी आणली, असे तीन वेळेस झाले. त्यामुळे मनमाडवरून मिळणारी डीपी ही जुनी किंवा जळालेली असते की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. फक्त शेतकऱ्यांची समजूत म्हणून मनमाड येथून डीपी दिली जाते. शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत कुठलेही उत्पादन मिळाले नाही. त्यामुळे थोडे पाणी विहिरीत असूनदेखील ते पिकांना देता येत नसल्याने व विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी याचा गांभीर्याने विचार करत नसल्याने शेतकरी अधिकच अडचणीत सापडला आहे. (वार्ताहर)
वीज समस्येने बळीराजा त्रस्त
By admin | Published: October 30, 2014 10:56 PM