आडगाव : ईडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना करत बलिप्रतिपदा उत्सव नाशिकची शिव असलेल्या हनुमाननगर परिसरात गुरुवारी (दि.८) पार पडला. यावेळी आरती संग्रह प्रकाशन व वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, नगरसेवक सुरेश खेताडे, प्रियांका माने, रु ची कुंभारकर, पप्पू माने, सुनील सूर्यवंशी, वाळू शिंदे, विष्णू सूर्यवंशी, राजू खैरे, अमोल सूर्यवंशी व कार्यकर्ते उपस्थित होते. पाडव्याच्या निमित्ताने नाशिकची शिव असलेल्या हनुमाननगर परिसरातील बळी महाराज मंदिरात पाडव्याच्या दिवशी हजारो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून त्याची पूजाही केली. त्यानंतर दीपोत्सव साजरा करीत आतषबाजी करण्यात आली. पहाटे बळीराजाच्या मूर्तीला अभिषेक करून पूजनाला सुरुवात झाली. शहर परिसरातील अनेक महिलांनी बाळीराजाचे औक्षण करून दिवाळीचा फराळ अर्पण करण्यात आला. मंदिरात पाडव्याच्या दिवशी सकाळपासूनच महिलांची व भाविकांची रीघ होती. शहर परिसरातील अनेक भाविकांनी बळी महाराज मंदिरात दर्शन घेतले.
बळी मंदिरात बलिप्रतिपदा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 1:22 AM