नाशिक : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मिरवणूक काढण्यास तसेच फटाके वाजविण्यास मनाई असतानाही जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजयाचे ढोल वाजले. विजयी उमेदवारांच्या उत्साही कार्यकर्त्यांनी मिवरणुका काढल्याने जमावबंदी आदेशाचेदेखील उल्लंघन होतानाचे चित्र दिसून आले. कारोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसंदर्भातील नियम केवळ कागदावरच राहिले. मतमोजणीच्या दिवशीही अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाले.
कारोनाचा धोका अजूनही कायम असल्याने संभाव्य गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यात विजयी मिरणूक काढण्यास मनाई करण्यात आलेली होती. मात्र जसजसे उमेदवारांचे निकाल हाती आले तसतसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आणि गुलालाची उधळण करतानाच ढोल-ताशांचाही गजर झाला. त्यामुळे काही ठिकाणी तहसील कार्यालयापासूनच विजयी उमेदवारांची मिरणूक काढण्यात आली. गावात पोहोचल्यानंतर गावकऱ्यांची विजयी उमेदवरांचीदेखील मिरवणूक काढल्याचे अनेक तालुक्यांमध्ये दिसून आले.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची संख्या तसेच उमेदवारांची संख्यादेखील मोठी असल्याने विजयी मिरणुका काढण्याची येण्याची दाट शक्यता असल्यामुळे मिरवणुकीला बंदी असल्याचे जाहिर करण्यात आले होते. मात्र बंदीचा नियम केवळ कागदोपत्रीच राहिला. उत्साही विजयी उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला. ढोल-ताशांचा गजर, गुलाल, पक्षीय ध्वज हातात घेऊन मिरणुका काढण्यात आल्या. गावांमध्ये जीप, ट्रॅक्टरवर विराजमान होत विजयी उमेदारांची गावागावातून मिरवणूक काढण्यात आली. काही ठिकाणी जेसीच्या पंजावर बसून विजयी उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला.