नाशिक - परिसरातील टोल नाक्यालगत असलेल्या साकोरे फाट्या जवळ पुष्ट्याने भरलेला ट्रकने गुरुवार दि२७ रोजी रात्री उशीरा शॉर्टसर्किट होऊन अचानक पेट घेतला असावा अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. काही महिन्यांपूर्वी त्याच परिसरात पेट घेतलेल्या बर्निंग कारच्या थरारची पुन्हा आठवण परिसरातील नागरिकांना झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ट्रक मधील मालाचे पूर्णपणे नुसकान झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिंपळगावच्या टोल नाक्या परिसरातील कोकणगाव शिवारात असलेल्या साकोरे फाट्याजवळ पुष्ट्याने भरलेला एम.एच ०५ .१६११ नाशिकहुन पिंपळगावच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहतूक ट्रकने प्राथमिक अंदाजेनुसार शॉर्टसर्किट होऊन पेट घेतला असल्याची माहिती महामार्ग व पिंपळगाव पोलीस प्रशासनाला लागताच त्यांनी तात्काळ ओझर एच.ए.एल व पिंपळगाव अग्निशामक प्रशासनाला घटनेची माहिती दिली. तातडीने अग्निशामक प्रशासनाच्या चार ते पाच बंबाच्या वाहनासह पथक घटनास्थळी दाखल झाले व अथक प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवले. वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये व आणि सुरक्षित वाहनांना प्रवास मिळाला यासाठी महामार्ग पोलीस पथक व पिंपळगाव पोलीस प्रशासनाचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी तैनात होते.