ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 27 - नाशिक जिल्हा हा कांदा, द्राक्ष व काही तालुक्यात डाळींबांची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. तिनही पिकांची मोठया प्रमाणावर निर्यात केली जाते. जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर सुरू झाली असुन पोळ कांदयाला आज बाजारात ३०० पासुन ते ६०० रूपयांपर्यत बाजारभाव मिळत असताना कांदा लागवडीचा खर्च सुध्दा निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
जिल्हयात आता उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. त्या कांद्याला योग्य भाव सरकारने दिला तरच शेतकरी तरु शकतो व शेतकºयावरील कर्ज फेडू शकतो. शेतक-यांना कर्ज माफी द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
https://www.dailymotion.com/video/x844vfo