सटाणा :तालुक्यातील अजमिर सौंदाणे येथील कोविड केअर सेंटर मधील अस्वच्छता, असुविधांविषयी वाभाडे काढणारा व्हिडिओ विलगीकरण झालेल्या संशयित रु ग्णांकडून व्हायरल झाल्याने प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. त्यानंतर येथील पालिका प्रशासनाकडून संपूर्ण इमारतीची स्वच्छता करून निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. दरम्यान भरती असलेल्या रु ग्णांनी या अस्वच्छतेला थेट पालिका प्रशासनाला जबाबदार धरले आहे तर पालिका प्रशासनाने हातवर करत जिल्हापरिषदेच्या आरोग्य यंत्रणेकडे बोट दाखवले आहे.सटाणा शहरात दररोज कोरोना बाधित रु ग्ण आढळत असल्याने संपर्कात आलेल्या संशयित रु ग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे .त्यामुळे साहजिकच अजमिर सौंदाणे येथील कोविड केअर सेंटर मध्ये तब्बल ६० ते ७० रु ग्णांना प्रशासनाने भरती केले आहे .दरम्यान दोन दिवसांपासून सटाणा येथील दाखल केलेल्या संशयितांनी चक्क या केअर सेंटरचेच स्टिंग आॅपरेशन केल्याचे उघडकीस आले आहे .प्रशासनाकडून पुरविण्यात आलेले निकृष्ट दर्जाचे अन्न ,तेच अन्न या सेंटरच्या इमारतीत अस्ताव्यस्त फेकलेले, ठिकठिकाणी फेकलेली अंडी त्यामुळे प्रचंड प्रमाणात सुटलेली दुर्गंधी, शौचालय साफ केली जात नसल्यामुळे दुर्गंधी आणि पसरलेले डासांचे साम्राज्य, पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही ,वेळेवर उपचार तर नाहीच दिवसा आड जेवण दिले जाते, ते ही निकृष्ट दर्जाचे. हे सर्व प्रशासनाचे पितळ उघडे करणारा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे . रु ग्णांनी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमुळे प्रशासकीय यंत्रणा मात्र खडबडून जागी झाली असुन पालिका प्रशासनाने संपूर्ण इमारत स्वच्छ करून तत्काळ निर्जंतुकीकरण केले आहे.
कोविड सेंटरमधील अस्वच्छतेचा व्हिडिओ व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 4:43 PM
अजमिर सौंदाणे : रुग्णानेच केले स्टिंग आॅपरेशन
ठळक मुद्देअजमिर सौंदाणे येथील कोविड केअर सेंटर मध्ये तब्बल ६० ते ७० रु ग्णांना प्रशासनाने भरती केले आहे