शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

सुशांतच्या घरी झालेल्या पुजाविधीचा व्हिडिओ व्हायरल; पंडित त्र्यंबकेश्वरमधील असल्याची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 6:05 PM

सुशांतने त्याच्या घरी कुटुंबासह कालसर्पशांतीचा पुजाविधी केल्याचा हा व्हायरल व्हिडिओ असल्याची जोरदार चर्चा आहे; मात्र कालसर्पशांतीची पुजा आद्य जोर्तिलिंग असलेल्या केवळ त्र्यंबकेश्वरमध्येच होऊ शकते.

ठळक मुद्देकालसर्पशांतीचा पुजाविधी केल्याचा व्हिडिओ व्हायरलत्या परप्रांतीय पुजाऱ्याचा आणि त्र्यंबकेश्वरचा काहीही संबंध नाहीव्हिडिओे व्हायरल झाला तेव्हापासून पुजारी भूमिगत

नाशिक : सिनेअभिनेता बॉलिवुड स्टार सुशांतसिंग राजपुतच्या मृत्यूमागील गुढ अद्याप उकललेले नाही. दरम्यान, सुशांतसिंग याने आपल्या कुटुंबासह वांद्रयातील घरी केलेल्या पुजाविधीचा व्हिडिओ नुकताच सोशलमिडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत दिसणारे पंडीत त्र्यंबकेश्वरमधील असल्याच्या चर्चेला सोमवारी (दि.१०) सकाळपासून उधान आले आहे. त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाने मात्र या बाबीचा इन्कार केला असून त्र्यंबकनगरीचा अन् त्या पुजाविधीचा कुठलाही संबंध नसल्याचे सांगत धार्मिकनगरीची बदनामी केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचे पुरोहित संघाचे अध्यक्ष प्रशांत गायधनी यांनी स्पष्ट केले आहे.सुशांतसिंह आत्महत्येप्रकरणाने बॉलिवुडला जबर हादरा बसला; मात्र महाराष्टÑासह बिहार राज्यातील राजकारणसुध्दा ढवळून निघाले आहे. सुशांतच्या आत्महत्येची चौकशी केली जात असताना आता त्याच्या वांद्रयातील घरात झालेल्या पुजाविधीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सोशलमिडियावर पुन्हा चर्चा रंगली आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारे पुजाविधी करणारे गुरुजी त्र्यंबकेश्वरमधील असल्याची बोलले जात आहे. त्र्यंबकनगरीच्या बाहेर एका लहानशा आश्रममधील ते पुजारी निवासी असल्याचे समजते; मात्र जेव्हापासून हा व्हिडिओे व्हायरल झाला तेव्हापासून पुजारी भूमिगत झाले आहे.सुशांतने त्याच्या घरी कुटुंबासह कालसर्पशांतीचा पुजाविधी केल्याचा हा व्हायरल व्हिडिओ असल्याची जोरदार चर्चा आहे; मात्र कालसर्पशांतीची पुजा आद्य जोर्तिलिंग असलेल्या केवळ त्र्यंबकेश्वरमध्येच होऊ शकते. कारण त्या पुजेला स्थानमहात्म्य प्राप्त आहे, असे पुरोहित संघाचे अध्यक्ष प्रशांत गायधनी यांनी सांगितले. सुशांतच्या घरी नेमकी कोणती पुजा झाली? याबाबतदेखील खात्री पटू शकलेली नाही.त्या परप्रांतीय पुजाऱ्याचा आणि त्र्यंबकेश्वरचा काहीही संबंध नाही. लाखो रुपये घेऊन कुठलीही पुजा होत नसते. आपल्या सोशलमिडियावर लोकांना भीतीदायक पोस्ट टाकून लाखो रुपये उकळण्याचे प्रकार काही लोक करतात. धार्मिकनगरी त्र्यंबकेश्वरची बदनामी यामुळे होत असून याबाबतची तक्रार त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात करणार आहे.- प्रशांत गायधनी, अध्यक्ष, पुरोहित संघ, त्र्यंबकेश्वर

 

 

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतtrimbakeshwarत्र्यंबकेश्वरNashikनाशिक