शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
2
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
3
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
4
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
5
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
6
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
7
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
8
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
9
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
10
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
11
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
12
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
13
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
14
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
15
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
16
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
17
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
18
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
19
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
20
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 

विधान परिषद निवडणूक : सर्वपक्षीयांचा सावध पवित्रा नारायण राणे यांच्या नावाने इच्छुक गर्भगळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 1:43 AM

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपातर्फे नारायण राणे यांच्या नावाची चर्चा सुरू होताच, भाजपाकडून इच्छुक असलेल्या किंबहुना गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांच्या पोटात गोळा उठला असून, मित्रपक्ष शिवसेना व कॉँग्रेस आघाडीने याबाबत सावध पवित्रा घेण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देराजकीय पक्षांचे बलाबल स्पष्ट निवडणुकीचा फड रंगणार विजयाचा चमत्कार घडण्याची शक्यता

नाशिक : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपातर्फे नारायण राणे यांच्या नावाची चर्चा सुरू होताच, भाजपाकडून इच्छुक असलेल्या किंबहुना गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांच्या पोटात गोळा उठला असून, मित्रपक्ष शिवसेना व कॉँग्रेस आघाडीने याबाबत सावध पवित्रा घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, राणे यांनीदेखील नाशिकमधून उमेदवारीबाबत होणारी चर्चा निरर्थक नसल्याचे म्हटल्यामुळे येणाºया काळात त्याभोवतीच राजकारण फिरण्याचे संकेत आहेत.जिल्ह्यातील इगतपुरी व त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील राजकीय पक्षांचे बलाबल स्पष्ट झाले असून, नजीकच्या काळात त्यात आता कोणतीही भर पडण्याची शक्यता नाही. त्यामुळे सध्याच्या बळावरच सहा महिन्यांनी होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीचा फड रंगणार आहे. सध्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात शिवसेना सर्वात पुढे व दुसºया क्रमांकावर भाजपा असून, राष्ट्रवादी कॉँग्रेस व कॉँग्रेस अनुक्रमे तिसºया व चौथ्या क्रमांकावर आहे. शिवसेनेने यापूर्वीच भाजपासोबत कोणतीही निवडणूक न लढविण्याचे जाहीर केल्यामुळे साहजिकच सेना व भाजपा परस्पर विरोधात लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सेनेचे स्थानिक स्वराज्य संस्थेत असलेले वर्चस्व पाहता अनेकांनी त्यावर दावेदारी करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत अवघ्या एका मताने पराभूत झालेले शिवाजी सहाणे यांनी तर गेल्या निवडणुकीपासूनच स्वत:ची उमेदवारी एकतर्फी घोषित करून टाकली आहे. त्यात आता जिल्हा बॅँकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे यांची भर पडली आहे. पक्षीय निष्ठेच्या निकषाचा विचार केल्यास सहाणे हे दराडेंपेक्षा उजवे ठरू शकतात, कारण दराडे यांची राजकीय भूमिका सोयीस्कररीत्या आजवर बदलत आल्याने भविष्यातही ते सेनेसोबत राहतीलच याची खात्री पक्षाला नाही. त्यातच राणे यांचे नाव पुढे आल्यास सेनेचे किती मतदार निष्ठावान राहतील, याविषयी खुद्द सेनेलाच शाश्वती नसल्यामुळे निवडणुकीत ‘रिस्क’ घेणाºयालाच उमेदवारी मिळू शकते. नारायण राणे यांच्यामुळे भाजपातील इच्छुकांचीही घालमेल वाढली आहे. पक्ष सत्तेवर आल्यापासून अनेकांना त्यांनी विधान परिषदेचा शब्द देऊन ठेवल्यामुळे अशा सर्वांचाच हिरमोड होणे स्वाभाविक आहे. अगदी त्र्यंबकच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या वळचणीला गेलेले राष्ट्रवादीचे परवेज कोकणी यांना तर प्रदेशाध्यक्ष दानवे यांनीच शब्द दिल्याचा छातीठोक दावा कोकणी समर्थक करीत आहेत. याशिवाय माजी जिल्हा परिषद सदस्य रत्नाकर पवार यांच्याही नावाची चर्चा होऊ लागली आहे. पवार यांच्या पत्नी मनीषा पवार या जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती आहेत. पवार यांचे व्यवसायानिमित्त सर्वपक्षीय सदस्यांशी संबंध आहेत. या खेरीज माजी आमदार वसंत गिते, विद्यमान आमदार अपूर्व हिरे यांचे नाव गेल्या वर्षभरापूर्वीपासून पक्ष पातळीवर घेतले जात आहे. परंतु आता नारायण राणे यांच्या नावाबाबत पक्ष खरोखरच गंभीर असेल तर मग इच्छुकांचे काय? असा प्रश्न पक्षापुढे उभा ठाकणार आहे.आघाडीत ‘बिघाडी’ करण्याचे कामकॉँग्रेस व राष्टÑवादी कॉँग्रेसला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत आघाडी करण्याशिवाय पर्याय नाही. परंतु सध्या आघाडीकडे काट्याची टक्कर देणारा उमेदवार दृष्टिपथात नाही. छगन भुजबळ यांची तुरुंगातून वापसी झाल्यानंतरच त्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. परंतु आघाडीने एकत्र लढून उमेदवार दिल्यास विजयाचा चमत्कार घडण्याची जेवढी शक्यता अधिक आहे, तितकेच आघाडीत ‘बिघाडी’ करण्याचे काम नारायण राणे सहजपणे करू शकतात, याची अनेकांना खात्री आहे. शिवाय मदतीला अपक्षांची लक्षणीय संख्या या निवडणुकीची रंगत वाढविण्यास तयार आहे.