शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
3
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
4
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
5
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
6
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
7
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
8
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
9
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
10
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
11
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
12
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
13
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
14
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
15
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
16
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
17
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
18
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
19
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
20
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 

ग्रामपंचायतीपासून युनेस्कोपर्यंतची माहिती असणारा लोकनेता, गावागावात 'ईडी'चीच चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 3:42 PM

शरद पवार यांची ‘लोकनेता’ ही ओळखच लोकसंग्रहातून झाली आहे.

-  संजय पाठक

नाशिक : शरद पवार! राजकारणातील दिग्गज नेतृत्व! मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्रिपदे भुषवलेली! जिल्ह्यावर प्रेम असलेल्या या नेत्याने नाशिककरांवर अतोनात प्रेम केले तसेच नाशिककरांनीदेखील अलोट प्रेम केलं. १९८५ मध्ये जिल्ह्यातील पंधराच्या पंधरा आमदार निवडून शरद पवार यांच्या पुलोद प्रयोगाला साथ दिली. काळ बदलला, राजकारणाची कूस बदलली तरी शरद पवार यांचे जिल्ह्याशी असलेले स्नेहसंबंध कधी दुरावले नाही. म्हणून शिखर बॅँक प्रकरणात शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यांनतर जे जे वातावरण बदलले, त्यात नाशिकमधील ग्रामीण भागात या घडामोडींचा परिणाम जाणविण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शरद पवार यांची ‘लोकनेता’ ही ओळखच लोकसंग्रहातून झाली आहे. नाशिकमध्ये आल्यानंतर पवार यांना भेटणाऱ्यांची रीघ लागते. त्यात तरुणांबरोबरच ग्रामीण भागातून येणाऱ्यांची संख्या अधिक असते. पवार साहेब आले म्हणजे आपण भेटावं आणि संवाद साधावा एवढीच माफक अपेक्षा त्यात असते. शरद पवार हेदेखील चांगदेवराव, यंदा कांदा काय म्हणतो? लासलगाव बाजार समिती काय म्हणते किंवा यावेळी द्राक्षाकडे लक्ष घालायला उशीर केला का शेतकºयांनी, असे विचारून त्यांच्याशी जवळीक साधतात. भर गर्दीत उभे असलेले श्रीराम शेटे असो अथवा येवल्याचे मारोतराव पवार असो, शरद पवार यांनी त्यांचे नाव घेऊन वास्तपुस्त केली की, ते सुद्धा भरून पावतात.

जिल्ह्यातील कसबे सुकेण्याच्या ग्रामपंचायतीपासून युनोस्कोपर्यंतची सर्व ताजी माहिती असणा-या पवार यांनी जिल्ह्यातील वर्तमानस्थिती विषयी काही विषय काढून त्यांच्याकडील अद्ययावत माहिती सांगितली की, सारेच थक्क होतात. पवार यांचे नेटवर्कच इतके तगडे आहे. परवाकडे नाशिकमध्ये विधानसभा निवडणुकीत इच्छुकांची मते अजमावणीसाठी आलेल्या शरद पवार यांनी बागलाण तालुक्यातील आमदाराला शिवसेनेत जाणार की येथे राहणार हे स्पष्ट सांगा आमच्याकडे दुसरे अनेक इच्छुक आहेत, असे सांगून एकेक इच्छुकांची नात्यागोत्यासहीत नावे सांगितल्याने आमदार महोदया थक्क झाल्या नसतील तर नवलच!

नाशिक जिल्ह्यातील मराठा विद्या प्रसारक समाज असो किंवा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ किंवा कुसुमाग्रज प्रतिष्ठान. पवार साहेबांचा संबंध अशा शेकडो संस्थांशी कायम राहिला. नाशिक जिल्हा शेतीत प्रयोगशील असल्याने येथे शेती वाढावी, कृषी आधारित उद्योग वाढावे हा त्यांचा आग्रह. त्यावर मतमतांतरे आक्षेप जरी असले तरी पवार यांच्याबरोबर राजकारणातील अनेक जण थकलेले असताना पवार मात्र त्यांच्या तिसºया पिढीचेदेखील नेतृत्व म्हणून लढत आहेत. नाशिक जिल्हा आता कधी काँगेसचा, कधी राष्ट्रवादीचा, तर कधी भाजप- सेनेचा जिल्हा मानला गेला असला तरी मुळात तो पवार यांचा जिल्हा म्हणूनच पुलोदच्या घटनेनंतर ओळखला गेला. शिखर बॅँक घोटाळ्याचा ठपका पवार यांच्यावर ठेवण्यात आल्यानंतर त्यांच्या इतकाच धक्का नाशिक जिल्ह्यातील लाखो नागरिकांना बसला. पवार यांची ग्रामीण भागाशी असलेली नाळ आणि यापूर्वी ग्रामीण भागातील पोहोचण्यासाठी असलेल्या सहकारी संस्था या सर्वांशीच संबंध! पवार यांनी सहकारी संस्था वाचविण्यासाठी वेळोवेळी धडपड केली आहे.

सार्वजनिक जीवनातील सुवर्ण महोत्सवानिमित्त नाशिकमध्ये एका प्रकट मुलाखतीत काही वर्षांपूर्वी पवार यांनी युती सरकारच्या विरोधात आपण स्वत: रस्त्यावर उतरणार असल्याचे सांगितले होते आणि तेच आज ते करीत आहेत. राष्ट्रवादीतील पक्षांतरे आणि सोयीने वागणाºया नेत्यांची कमी होणारी साथ यानंतरदेखील पवार हे आज खंबीरपणे लढताना, ग्रामीण भागातील जनतेला आशादायी चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, असे असताना पवार यांच्यावर झालेली कारवाई आणि कोणत्याही बॅँकेचे संचालक नसताना आपल्यावर कारवाई केल्याबद्दल पवार यांनी व्यक्त केलेली अनभिज्ञता यामुळे ग्रामीण भागात सहानुभूती तर आहेच परंतु यानिमित्ताने कार्यकर्तेदेखील पेटून उठले आहेत. त्याचे शक्तिप्रदर्शन लक्षात घेऊन थेट पोलीस यंत्रणेला आणि ईडीला माघार घेण्याची नामुष्की आली. कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले, आंदोलने होऊ दिली नाहीत. हे जरी खरे असले तरी त्याचे परिणाम या निवडणुकीत विशेषत: ग्रामीण भागात जाणविण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNashikनाशिक