ठाणगाव: सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या पुंजाजी रामजी भोर विद्यालय व डॉ.अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने 'विद्यार्थी तेथे शाळा ' हा उपक्रम राबविण्यात येत आहे.प्राचार्य व्ही. एस. कवडे यांच्या संकल्पनेतून जेथे विद्यार्थी तेथे शाळा हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. रयत शिक्षण संस्थेने कोरोनाच्या महामारीत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांचा व्हॉट अँप ग्रुप बनवून प्रतिदिन दोन विषयाच्या २० गुणांच्या गुणांच्या आॅनलाईन चाचण्या दिल्या जातात, तसेच अँड्रॉइड मोबाईल असणाऱ्या शाळेतील सुमारे माध्यमिक विभागातील ८६६ विद्यार्थ्यांपैकी ६३३ विद्यार्थ्यांना ‘नवनीत टॉप स्कोरर ‘ हे अँप डाऊनलोड करून अभ्यास करतात. मात्र ग्रामीण भागात राहिलेल्या २३३ विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात सक्रिय करणे गरजेचे असल्याने यासाठी प्रत्येक शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन दिलेले स्वाध्याय व वर्गपाठ पूर्ण करणे गरजेचे आहे ही संकल्पना प्राचार्य कवडे यांनी मांडली. परिसरातील आडवाडी, म्हाळुंगी, काळेवाडी, भलेवाडी, घुटेवाडी, रताळवाडी या परिसरातील विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाऊन शिकविण्याची प्रक्रिया सुरू झाली यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या शिक्षकांचा प्रश्न मार्गी लागला असे प्राचार्य व्ही.एस.कवडे यांनी सांगितले. विद्यालयाने राबविलेला हा प्रकल्प अतिशय चांगला आहे त्यामुळे विद्यार्थी अभ्यास करण्यास प्रवृत्त होतील आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही अशी प्रतिक्रिया पालक वर्गाकडून व्यक्त होत आहे विद्यालयाचे उपशिक्षक बी.एस.भांगरे व ए.बी.कचरे यांनी परिसरातील म्हाळुंगी ,काळेवाडी, भलेवाडी, सोंगाळ वाडी ,रताळवाडी, सोमठाने या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यांचे गृहकार्य तपासले व त्यांना गृहकार्य दिले त्यावेळी विद्यार्थी देखील आनंदाने अभ्यास कार्यात सहभागी झाले होते.
ठाणगावच्या भोर विद्यालयाचा 'विद्यार्थी तिथे शाळा' उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 4:33 PM
ठाणगाव: सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या पुंजाजी रामजी भोर विद्यालय व डॉ.अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने 'विद्यार्थी तेथे शाळा ' हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
ठळक मुद्देविद्यार्थी देखील आनंदाने अभ्यास कार्यात सहभागी