वरखेडा- दिंडोरी तालुक्यातील म्हेळूस्के तसेच वरखेडा येथील भूसाळवस्ती परिसरात आज दुपारी पुन्हा एकदा बिबट्याने दर्शन दिल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.म्हेळूस्के, लखमापूर, ओझे, करंजवन, परमोरी, हातनोरे, अवनखेड, चिंचखेड या परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. शासनाने याची दाखल घेत परिसरात पिंजरे लावून वनविभाग कर्मचाºयांची संख्या वाढविण्याची मागणी जोर धरत आहे. बिबट्या हा पिंजºयाजवळ आगमन करतो व अवतीभोवती फिरत पुन्हा माघारी जातो. हा सिलिसला चालूच असल्याने शेतकरी शेतीकाम करण्यास घाबरत आहेत. त्यामुळे वनविभागाने याची तातडीने दखल घेत लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थ व शेतकºयांनी केली आहे.
वरखेडा परिसरात बिबट्याचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 3:06 PM