नाशिक : ‘जय शिव शंंभो’ आणि ‘बम बम भोले’च्या जयघोषाने नाशिकनगरी दुमदुमली. महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्तांनी पहाटेपासूनच सोमेश्वर व कपालेश्वर येथे दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. शहरातील प्रमुख महादेव मंदिरांत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होेते. लाखो नाशिककरांनी महाशिवरात्रीनिमित्त सोमेश्वर व कपालेश्वर येथे महादेवाचे दर्शन घेतले.औरंगाबादरोडवरील जनार्दनस्वामी आश्रमातील सर्वायेश्वर मंदिरात पहाटेच विधिवत महापूजा करण्यात आली. सायंकाळी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर साबूदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. कपालेश्वर मंदिरात भाविकांची पहाटेपासूनच गर्दी होती. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सकाळी महापूजा करण्यात आली. संध्याकाळी पालखी सोहळा व दिवसभर उपवासाच्या खिचडीचे वाटप करण्यात आले. तसेच रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. मंदिरापासून शंभर मीटर अंतरावरच बॅरेकेडिंग लावल्याने वाहनांची कोंडी होत होती. सरदार चौक, पंचवटी कारंजा येथे वाहने लावल्याने तेथे वाहनांची कोंडी होत होती.
महाशिवरात्रीनिमित्त सोमेश्वर व कपालेश्वर येथे महादेवाचे दर्शन
By admin | Published: February 18, 2015 1:43 AM