दिंडोरी : तालुक्यात तुफान पर्जन्यवृष्टी सुरू असून, पालखेड धरण भरण्याच्या मार्गावर असल्याने धरणातून कादवा नदीत विसर्ग सोडण्यात आला आहे. प्रशासनाने कादवा नदीकाठच्या दिंडोरी व निफाड तालुक्यातील गावांत सतर्कतेचा इशारा दिला आहे. याबाबत प्रांताधिकारी मुकेश भोगे यांनी अधिकृत माहिती दिली असून, पालखेड धरणातून कादवा नदीत १५,२५० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होतो आहे. कादवा नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी दक्षता बाळगण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. (वार्ताहर)
कादवा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
By admin | Published: July 11, 2016 11:17 PM