नाशिक : हवे तसे जगण्याचा प्रत्येक स्त्रीला अधिकार आहे. तिला आवडत असतात त्या गोष्टी तिने निश्चित कराव्यात. हे साºया प्रकारचे स्वातंत्र्य उपभोगताना त्यामुळे होणाºया परिणामांची जबाबदारीही महिलांनाच घ्यावी लागणार आहे आणि त्यासाठी त्यांनी सिद्ध असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन स्व-संरक्षक प्रशिक्षक अंजुषा चौघुले यांनी केले. पोलीस आयुक्तालय व शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने दादासाहेब गायकवाड सभागृहात आयोजित ‘मी माझी रक्षक’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. चौघुले पुढे म्हणाल्या की, आवडीचे पोषाख करणे, हव्या त्या वेळी हव्या त्या ठिकाणी जाणे, हवे ते खाणे-पिणे, मजा करणे या साºया गोष्टी करण्याचे स्वातंत्र्य महिलांना आहेत. हे स्वातंत्र उपभोगताना त्याचे काही परिणाम झाले तर मात्र महिलांनी त्याला सक्षमतेने तोंड देण्याची तयारी ठेवावी. ती असेल तरच तुम्ही निश्चिंतपणे जीवन जगू शकाल, असे सांगत त्यांनी महिलांनी स्व-संरक्षणाच्या विविध पैलूंबाबत प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, मिसेस ग्लोबल युनायटेड नमिता कोहोक, आंतरराष्टÑीय धावपटू कविता राऊत, मोनिका आथरे, महिला बालकल्याण विभागाच्या सचिव विनिता सिंगल, जिल्हा परिषदेचे उपकार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंढे, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, योग अभ्यासिका प्रज्ञा पाटील, रोहिणी दराडे, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.शहरातील विविध क्षेत्रात उल्लोखनीय कामगिरी करणाºया महिलांचा मान्यवरांच्या हस्ते यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात बलदंड देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार देवयानी फरांदे व सीमा हिरे यांनी मनोगत व्यक्त केले. विनिता सिंगल यांनी महिलांना आज प्रत्येक टप्प्यावर निरनिराळ्या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. त्याचा विचार करून महाराष्टÑ शासन निरनिराळ्या योजना व उपक्रमांद्वारे महिलांच्या सबलीकरणावर भर देत असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी सायबर गुन्हे, कुटुंबातील संवादाचे महत्त्व, सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर आदींविषयी मार्गदर्शन केले. सीमा पेठकर यांनी सूत्रसंचालन केले.स्व-संरक्षणाचा गुरूमंत्रमहिलांनी स्व-संरक्षणासाठी आत्मविश्वास, आंतरशक्ती, सामान्यज्ञान, सतर्कता व तार्किकता या पंचसूत्रीचा हुशारीने वापर करावा. दररोज सकाळी स्वत:शी संवाद साधावा. महिलांनी वयाच्या कोणत्याही टप्प्यात शिकणे, स्वत:ला अद्ययावत करणे थांबवू नये. मागे पडलेल्या आवडी-निवडी वेळ मिळताच पूर्ण कराव्यात. शारीरिक, भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षमता आणावी. छोट्या-छोट्या कामांसाठी परावलंबित्व कमी करावे. घरात, समाजात वावरताना वाईट प्रवृत्तीच्या माणसांकडून शारीरिक त्रास दिला जात असेल तर त्याला कडकपणे प्रतिकार करा, अशा अनेक महत्त्वपूर्ण सूचना अंजुषा चौघुले यांनी यावेळी केल्या.
स्वातंत्र्य उपभोगतानाच सतर्कता आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 12:55 AM