सिन्नर : झुंजूमुंजू होताच गावात एकच गोंगाट सुरू झाला...बिबट्या आल्या रेऽऽच्या आरोळ्या ऐकून अनेकांची पाचावर धारण बसली. पूर्ण वाढ झालेला बिबट्या गावात आल्याची वार्ता सर्वत्र पसरली. लपन शोधत-शोधत बिबट्या एका कुडाच्या गोठ्यात आश्रयाला बसला होता. गोठा साफ करण्यासाठी महिला गोठ्यात गेल्यानंतर बिबट्याने हल्ला करून तिला किरकोळ जखमी केले. गोठ्यात बांधलेल्या तीन म्हशी बिबट्याला पाहून एकच हंबरडा फोडतात आणि एक म्हैस दावं तोडून बाहेर पडते. या गोंधळात काही सतर्क नागरिक धाडस करून गोठ्याचा दरवाजा बाहेरून बंद करून घेतात आणि बिबट्या गोठ्यात कोंडला जातो. बिबट्या गोठ्यात कोंडल्याची वार्ता मिळाल्यानंतर वनविभाग घटनास्थळी जाऊन बिबट्याला पिंजºयात जेरबंद करण्याची मोहीम फत्ते करतात. गावात आलेल्या बिबट्या अगोदर गोठ्यात आणि नंतर वनविभागाच्या पिंजºयात जेरबंद करण्याचा थरार सिन्नर तालुक्यातील खापराळे ग्रामस्थांनी मंगळवारी सकाळी ‘याचि देही, याची डोळा’ अनुभवला. सिन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील खापराळे गावात सकाळी सात वाजेच्या सुमारास बिबट्या गावात आल्याची वार्ता पसरली. बिबट्या लपन शोधण्यासाठी दादा विठोबा बिन्नर यांच्या कुडाच्या गोठ्यात शिरतो. सकाळी सात वाजेच्या सुमारास गोठ्यात साफसफाई करण्यासाठी भागूबाई बिन्नर आत जातात. गोठ्यात बसलेल्या बिबट्याने भागूबाई यांच्यावर हल्ला केला. त्यात त्या किरकोळ जखमी झाल्या. यावेळी म्हशींनी एकच हंबरडा फोडला. जोरजोरात आवाज आल्याने समोरच राहणारे वनविभागाचे वनमजूर बाबूराव सदगीर आणि ग्रामस्थ हिंमत धरून गोठ्याजवळ येतात. बिबट्याला पाहून एक म्हैस दावे तोडून बाहेर पळते. यावेळी बिबट्याने बांधलेल्या दोन म्हशींवर हल्ला केला. दोन्ही म्हशींच्या डोळ्यांना बिबट्याने गंभीर इजा केली; मात्र सदगीर यांच्यासह सतर्क ग्रामस्थ बाहेरून गोठ्याचे दार बंद करतात. त्यामुळे बिबट्या गोठ्यात कोंडला जातो. गोठ्यात बिबट्या कोंडल्याची वार्ता सिन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर बोडके यांनी दिल्यानंतर वनपाल पी. के. सरोदे, ए. के. लोंढे, शरद थोरात, के. आर. इरकर, पी. जी. बिन्नर यांच्यासह कर्मचाºयांनी पिंजरा घेऊन खापराळे येथे धाव घेतली. पिंजºयाचे व गोठ्याचे दार उघडण्यात आले. बिबट्या एका कोपºयात लपला होता. वनकर्मचाºयांनी त्या बाजूला जाऊन घुंगरांचा आवाज करीत बिबट्याला दरवाजाच्या दिशेने येण्यास भाग पाडले. बिबट्या गोठ्याच्या दरवाजातून पिंजºयात गेला आणि पिंजºयाचे दार बंद झाले. सुमारे पाच वर्षांचा नर बिबट्या पिंजºयात जेरबंद होताच खापराळे ग्रामस्थ व नागरिकांनी समाधान व्यक्त केले. खापराळे ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे वनविभागाला बिबट्या जेरबंद करण्यात यश आले.
गावात आलेला बिबट्या केला जेरबंद ग्रामस्थांची सतर्कता : खापराळेतील थरार; महिलेसह दोन म्हशी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 12:41 AM
सिन्नर : झुंजूमुंजू होताच गावात एकच गोंगाट सुरू झाला...बिबट्या आल्या रेऽऽच्या आरोळ्या ऐकून अनेकांची पाचावर धारण बसली.
ठळक मुद्देबिबट्याने हल्ला करून जखमी केलेपिंजºयात जेरबंद करण्याचा थरार