शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

अर्धवेळ ग्रंथपालांची होणार सेवाज्येष्ठता पडताळणी ; नाशिक  शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून विशेष शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 6:00 PM

राज्यातील ५९६ अर्धवेळ ग्रंथपालांचे पूर्णवेळ पदावर समायोजन करण्याविषयी शासन निर्णय जाहीर झाला असून केला असून त्यानुसार राज्यातील कार्यरत अधेर्वेळ/पूर्णवेळ  ग्रंथपाल व रिक्त पदांची माहिती संकलनासाठी व जिल्ह्यातील अर्धवेळ ग्रंथपालांची सेवाज्येष्ठता तयार करण्यात आली आहे. या यादीतील माहीतीची पडताळणी करण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालाने विशेष शिबिराचे आयोजन केले आहे. 

ठळक मुद्देअर्धवेळ/पूर्णवेळ ग्रंथपाल व रिक्त पदांची माहिती संकलनअर्धवेळ ग्रंथपालांची होणार सेवाज्येष्ठता पडताळणीशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून विशेष शिबिराचे नियोजन

नाशिक : राज्यातील ५९६ अर्धवेळ ग्रंथपालांचे पूर्णवेळ पदावर समायोजन करण्याविषयी शासन निर्णय जाहीर झाला असून केला असून त्यानुसार राज्यातील कार्यरत अधेर्वेळ/पूर्णवेळ  ग्रंथपाल व रिक्त पदांची माहिती संकलनासाठी व जिल्ह्यातील अर्धवेळ ग्रंथपालांची सेवाज्येष्ठता तयार करण्यात आली आहे. या यादीतील माहीतीची पडताळणी करण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालाने विशेष शिबिराचे आयोजन केले आहे. शिक्षण विभागाने यापूर्वी शिबिराच्या माध्यमातून ग्रंथपालांची माहीती संकलित करून संचालक कार्यालयास सादर केली होती. त्यानुसार सेवा ज्येष्ठत यादी तयार झाली आहे. परंतु, सर्व जिल्ह्यातील अर्धवेळ  ग्रंथपालांची राज्यस्तरीय सेवाज्येष्ठता यादी तयार करण्याकामी जिल्ह्यातील ग्रंथपालांची सेवाज्येष्ठता यादी अंतिम होणे आवश्यक आहे. त्यासाठी संचालनालयाने दि.२३ जानेवारी २०१९ च्या पत्रानुसार सर्व जिल्हा शिक्षणाधिकारी यांना या अर्धवेळ सेवाज्येष्ठता यादीसंदभार्तील वेळापत्रकानुसार कार्यक्रम निश्चित करून दिलेला आहे. या वेळापत्रकानुसार अर्धवेळ ग्रंथपालांनी त्यांची सेवाज्येष्ठतेमध्ये नमूद असलेल्या माहीतीची पडताळणी करण्यासाठी व हरकतींसाठी शिक्षण विभागाने विशेष शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबीरात सेवाज्येष्ठता यादितील दुरुस्त्या व हरकतींची नोंद घेण्यात येणार आहे. अंतीम सेवाज्येष्ठता यादीही यादिवशीच दुपारी ४ वाजेपर्यंत जाहीर होण्याची शक्यता सुत्रांनी वर्तविली असून हीच अंतिम सेवाज्येष्ठता यादी शिक्षण उपसंचालक  कार्यालयामार्फ त संचलनालयाकडे सादर केली जाणार आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील अर्धवेळ ग्रंथपालांची सेवाज्येष्ठता यादी शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेत स्थळावर जाहीर करण्यात आली असून ग्रंथपालांनी आपल्या माहीतीची व सेवा ज्येष्ठतेबाबतची पडताळणी करुन  घ्यावी व दुरूस्तीसाठी शिबिरात उपस्थित रहावे असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. 

शिबिरातच यादी अंतीम करण्याचा मानस शिक्षण विभागाने हरकतींसाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतही वाढवून दिलेली आहे. तरीही शिबिरस्थळावरच सेवाज्येष्ठता यादी अंतिम करण्याचा मानस असून  या शिबिरास संबंधित ग्रंथपालांनी उपस्थित रहावे असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकlibraryवाचनालय