नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य सहकारी बॅँक असलेल्या नाशिक मर्चंट को. आॅप. बॅँकेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक विजय राजाराम साने यांची बिनविरोध निवड करण्यात आली.बॅँकेच्या सातपूर येथील मुख्य प्रशासकीय कार्यालयात सोमवारी (दि.११) संचालक मंडळाची बैठक सुरक्षित अंतर ठेवून घेण्यात आली यावेळी ही निवड करण्यात आली. यावेळी मनोगत व्यक्त करताना साने यांनी दीड वर्षापूर्वी बॅँकेत प्रशासकीय राजवट असताना बॅँकेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता, मात्र बॅँकेच्या निवडणुकीत एक हाती सत्ता दिल्यानंतर या बॅँकेला गतवैभव प्राप्त करून देण्यात संचालक यशस्वी ठरल्याचे सांगितले. नजीकच्या काळात बॅँकेची थकबाकी वसूल करून देण्यासाठी कठोर पावले उचलावी लागतील. मात्र सर्व सामान्य नागरिकांची आपली बॅँक ही ओळख कायम ठेवण्यात येईल, असे सांगितले. पक्षीय राजकारणाचे जोडे बाहेर ठेवून या बॅँकेत कामकाज केले जात असल्याचे यावेळी बॅँकेचे ज्येष्ठ संचालक वसंत गिते यांनी सांगितले.यावेळी ज्येष्ठ संचालक हेमंत धात्रक, सुभाष नहार, प्रशांत दिवे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक ठाकूर, गौतम संचेती यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीस भानुदास चौधरी, प्रकाश दायमा, शिवदास डागा, कांतीलाल जैन, रंजन ठाकरे, हरीश लोढा, गणेश गिते, प्रफुल्ल संचेती, नरेंद्र पवार, महेंद्र बुरड, संतोष धाडीवाल, अशोक सोनजे, शोभा छाजेड, रजनीताई जातेगावकर, अरुण कुमार मुनोत, विजय कारे आदी उपस्थित होते.----------ज्येष्ठ संचालकांबरोबर चांगला अनुभवहुकूमचंद बागमार यांच्या नेतृत्वाखाली केवळ प्रशासकीय कारकीर्द वगळता बॅँकेने कायम प्रगतीच केली असल्याचे गिते म्हणाले. यावेळी मावळते संचालक सोहनलाल भंडारी यांच्या कार्याचाही गौरव करण्यात आला. बॅँकेचे उपाध्यक्ष अविनाश गोठी यांनी भंडारी आणि साने यांच्यासारख्या ज्येष्ठ संचालकांबरोबरच काम करण्याचा अनुभव चांगला असल्याचे सांगितले.
नामकोच्या अध्यक्षपदी विजय साने बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 10:48 PM