नाशिक : रवींद्रनाथ टागोर क्रिकेट ट्रॉफि स्पर्धेत रवींद्रनाथ विद्यालयाच्या संजय ठाकूर याने ४६ चेंडूत ११६ धावा केल्या. पहिल्या विकेटसाठी संजय ठाकूर आणि गौरव बैस यांनी १६१ धावांची विक्रमी भागीदारी केली.येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रथम नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी स्विकारली. प्रथम फलंदाजी करीत संधीचे सोने करीत रवींद्रनाथ विद्यालयाने स्पेस इंटरनॅशनलसमोर २१६ धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाला तोंड देताना स्पेसचे केवळ ६१ धावांत सर्व गडी बाद झाले. पहिला सामना रंगूबाई जुन्नरे स्कूल विरूध्द होरायझन अकॅडमी यांच्यात झाला. होरायझनने प्रथम फलांदाजी करीत ९८ धावा केल्या. रंगूबाई जुन्नरे स्कूलच्या खेळाडूंनी हे आव्हान सहज पार करून सामना जिंकला. सामनावीर म्हणून जुन्नरे स्कूलचा खेळाडू हेरंब भुधर यास मिळाला.रवींद्रनाथ विद्यालयाच्या सामनावीर खेळाडू संजय ठाकूर याचा सत्कार संस्थेचे उपाध्यक्ष वसंत राऊत यांच्या हस्ते संजयचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मनोज पिंगळे, संचालाक हरी काशिकर, रामदास गायधनी, प्रशिक्षक राहूल नन्नावरे, एकनाथ जगताप व खेळाडू उपस्थित होते. (०६क्रिकेट ठाकूर)
रवींद्रनाथ टागोर क्रीकेट ट्रॉफी सामन्यात विक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2019 4:33 PM
नाशिक : रवींद्रनाथ टागोर क्रिकेट ट्रॉफि स्पर्धेत रवींद्रनाथ विद्यालयाच्या संजय ठाकूर याने ४६ चेंडूत ११६ धावा केल्या. पहिल्या विकेटसाठी संजय ठाकूर आणि गौरव बैस यांनी १६१ धावांची विक्रमी भागीदारी केली.
ठळक मुद्देरवींद्रनाथ विद्यालयाच्या सामनावीर खेळाडू संजय ठाकूर याचा सत्कार संस्थेचे उपाध्यक्ष वसंत राऊत यांच्या हस्ते संजयचा सत्कार करण्यात आला.