येवला : ग्रामीण भागात ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पनेला यंदा अभूतपूर्व यश आले असून, उपविभागातील नांदगाव, चांदवड व येवला तालुक्यांमध्ये तब्बल २२३ गावात एक गणपतीची स्थापना झाली असून, पोलिसांच्या प्रयत्नांना चांगलेच यश आले आहे. ग्रामीण पोलीस दलात गणेशोत्सव मंडळांसाठी विघ्नहर्ता बक्षीस योजनेचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या संकल्पनेतून ही योजना राबविण्यात आली आहे. यासाठी दराडे व डॉ. खाडे यांनी येवल्यात, मनमाडला येऊन मंडळाची बैठका घेतल्या. प्रत्येक पोलीस ठाणे पातळीवर गणेश मंडळ, डॉल्बी मालकांचे प्रबोधन करण्यात आले. स्थानिक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व त्यांच्या सहकाºयांनीदेखील गावोगावी जनजागृती केली. अधीक्षक दराडे यांनी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाला बळ देण्यासाठी गावागावात ‘एक गाव, एक गणपती’चा पुरस्कार करीत हा उपक्र म गावागावांत पोहोचविण्यासाठी पोलीस दलावर जवाबदारी दिली, ती मनमाड उपविभागात यशस्वी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ‘‘गावांतील जास्त गणपतीमुळे होणारे वाद,गुन्हे,गटबाजी थांबून गावातील सामाजिक एकोपा,सलोखा राखावा हि भूमिका घेऊन जिल्हा पोलीस प्रमुख संजय दराडे यांनी येवला,मनमाडला बैठका घेऊन आम्हांला प्रेरणा दिली सर्व पोलीस अधिकारी,पोलीस पाटलांच्या बैठका घेऊन तंटामुक्त गावे करण्यासाठी एकच गणपतीची स्थापना करून असे आवाहन केले.मंडळानी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने येवला,मनमाड,नांदगाव या तालुक्यात यंदा विक्र मी गावात हा उपक्र म राबवला आहे.अश्या आदर्श मंडळातून विघ्नहर्ता बक्षीस योजनेचे मानकरी देखील निवडून त्यांना सन्मानित करणार आहोत.’’ -डॉ.राहुल खाडे, पोलीस उपअधीक्षक,मनमाड उपविभागमनमाड पोलीस ठाण्याअंतर्गत १४३ लहान व मोठे मंडळ असून, १९ गावांत एक गाव, एक गणपती संकल्पना राबविली आहे. नांदगावमध्ये ८८ मंडळांपैकी ५० गावांत, चांदवडमध्ये ७४ मंडळांपैकी ३९ गावात ही संकल्पना राबविली गेली आहे. येवला शहर हद्दीतील छोटी-मोठी १३७ मंडळे असून, १९ गावांत तर येवला तालुक्यात तब्बल ७० गावांत एक गणपतीची स्थापना झाली आहे. वडनेरभैरव ठाणे अंतर्गत २६ गावात एक गणपती आहे. म्हणजेच नांदगाव, चांदवड व येवला तालुक्यांमध्ये तब्बल २२३ गावात एक गणपतीची स्थापना झाली असून, पोलिसांच्या प्रयत्नांचे हे विक्र मी यश मानले जात आहे. विशेष म्हणजे २०१६ मध्ये हाच आकडा फक्त ७७ तर २०१४ व २०१५ मध्ये ७० च्या आसपास होता. या आकड्यानुसार येवला तालुक्यात सर्वाधिक ८९ ,नांदगाव तालुक्यात ६९ तर चांदवड तालुक्यात ६५ गावांत हि संकल्पना यशस्वी झाली असल्याचे मनमाड पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.राहुल खाडे यांनी सांगितले.
२२३ गावात एक गाव, एक गणपती उपक्र म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 1:10 AM