नाशिक दि. 19 :- मुलांची हिंसा, उपेक्षा आण िशोषण ह्या परिस्थिती पासून मुलांच्या संरक्षणासाठी व संरक्षक वातावरण निर्मितीसाठी 26 जानेवारी, 2015 रोजी होणार्या ग्राम सभेमध्ये जिल्ह्यातील प्रत्येक महसुली गावामध्ये ‘ग्राम बाल संरक्षण समतिीची’ करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा बाल संरक्षण समतिीचे अध्यक्ष विलास पाटील यांनी दिले आहेत. शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने याबाबत दिलेल्या निर्देशानुसार ठराव घेऊन करावयाच्या ग्राम बाल संरक्षण समतिीमध्ये अध्यक्षांसह 10 सदस्य असतील.संरपच किंवा ग्राम स्थरावर निवडून आलेला अथवा ग्राम पंचायतद्वारे नियुक्त केलेला/ केलेला प्रतिनिधी हे समतिीचे अध्यक्ष असतील. पोलीस पाटील, आशा सेविका, प्राथमिक, माध्यमिक (अनुदानीत) शाळांचे मुख्यध्यापक अथवा शिक्षक, शाळा व्यवस्थापक समतिीचे अध्यक्ष यांपैकी एक-एक सदस्य, स्थानिक सामाजिक संस्था जसे स्वयंसेवी संस्था, बचत गट, महिला मंडळ पैकी 3 सदस्य, यामध्ये 12 ते 18 वर्षे या वयोगटातील मुलगा व मुलगी यांचे प्रतिनिधी सदस्य असतील. तसेच अंगणवाडी सेविका या ग्राम बाल संरक्षण समतिीच्या सदस्य सचिव असतील.
प्रत्येक गावात ग्राम बाल संरक्षण समित्या स्थापन होणार
By admin | Published: January 20, 2015 1:07 AM