सायखेडा : येथे कोरोनाचे रु ग्ण वाढत असल्याने तसेच गोदाकाठची प्रमुख बाजारपेठ सायखेडा असल्याने येथे परिसरातील ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात राबता असतो. सायखेडा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रच्या माहीतीनुसार सायखेडा येथे ८३ रु ग्ण सद्यस्थितीत असुन त्यामुळे येथील व्यापारी संघटना व ग्रामस्थ व ग्रामपंचायत ने एकत्रित येऊन तीन दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व संसर्ग थांबवण्यासाठी गाव बंद करणे गरजेचे होते. त्यामुळे दिनांक १२ ते १४ सप्टेंबर पर्यंत गाव बंद ठेवण्यात आले आहे. तसेच गावात सोडिअम हायपोक्लोराईट व डासांसाठी देखील डास प्रतिबंधक फवारणी करण्यात येत आहे. तसेच विनाकारण गावात न फिरण्याचे व अत्यावश्यक सेवेसाठीच बाहेर पडावे व मास्क आणि सॅनिटायझर वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.बाजारपेठ तीन दिवस बंद असल्याने गावात विनाकारण येऊ नये तसेच प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या मागील काही महिन्यांपासुन लॉकडाऊनमुळे व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत असुन आगामी काळात व्यावसायिकांना स्वत:ची योग्य काळजी घ्यावी लागेल. मास्क व सॅनिटायझर, हॅन्डग्लोज वापरावे तसेच दुकानांत सोशल डिस्टनसिंग ठेवून आलेल्या ग्राहकांची नोंद ठेवावी तसेच कोरोना संबंधित सर्दी, खोकला व अन्य लक्षणे दिसु लागल्यास चांदोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच उपकेंद्र सायखेडा येथे जाऊन माहिती द्यावी व आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन ग्रामपालिकेकडुन करण्यात आले आहे.(फोटो १२ सायखेडा १)सायखेडा येथील व्यापारी संघटनांनी एकत्र येत तीन दिवसांचा स्वयंघोषित बंदला मिळालेला प्रतिसाद.
कोरोनाचे रु ग्ण वाढत असल्याने सायखेडा येथे तीन दिवस गाव बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 7:31 PM
सायखेडा : येथे कोरोनाचे रु ग्ण वाढत असल्याने तसेच गोदाकाठची प्रमुख बाजारपेठ सायखेडा असल्याने येथे परिसरातील ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात राबता असतो. सायखेडा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रच्या माहीतीनुसार सायखेडा येथे ८३ रु ग्ण सद्यस्थितीत असुन त्यामुळे येथील व्यापारी संघटना व ग्रामस्थ व ग्रामपंचायत ने एकत्रित येऊन तीन दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
ठळक मुद्देव्यापारी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद