--
मालेगाव शहरालगतच्या चाळीसगाव फाटा भागात गावठी कट्टा बाळगणाऱ्या फैजान अहमद शब्बीर अहमद या संशयित आरोपीसह तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवीदास डुमणे, पोलीस हवालदार सुभाष चोपडा, कैलास चोथमल आदी. (०५ मालेगाव २)
---------------------------
पाटणे फाट्यावर सहा जनावरे जप्त
पोलिसांची कारवाई; अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावर पाटणे फाट्यावर कत्तलीच्या हेतूने पिकअप वाहनातून जनावरांची वाहतूक करणाऱ्या अज्ञात चालकाविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सहा जनावरे व पिकअप असा तीन लाख ५६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार सुभाष चोपडे यांनी फिर्याद दिली आहे. सोमवारी सकाळी १० वाजता ही कारवाई करण्यात आली. चोपडा यांना चांदवड-मालेगावदरम्यान पिकअप वाहनातून कत्तलीच्या हेतूने जनावरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली होती, त्यानुसार पाटणे फाटा येथे हवालदार चोपडा, खैरनार, चव्हाण, वाघ यांनी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली होती. नाकाबंदी करीत असताना नाशिककडून येणाऱ्या पिकअपची (क्र. एमएच ०५ बीएच १११४) हिची तपासणी केली असता सहा जनावरे कोंबलेली आढळून आली. पिकअपचालक फरार झाला आहे. पोलिसांनी जनावरे व ५६ हजार रुपये किमतीची पिकअप असा तीन लाख ५६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
===Photopath===
050421\05nsk_41_05042021_13.jpg
===Caption===
०५ मालेगाव २