दिंडोरी : महाराष्ट्र राज्य गांव कामगार दिंडोरी पोलीस पाटील संघटनेच्या वतीने पोलीस पाटील दिन व स्नेह मेळावा निमित्ताने सेवानिवृत्त पोलिस पाटलांना पुष्प गुच्छ व सन्मान चिन्ह देवून गौरवण्यात आले. यावेळी वृक्षारोपण करून, निसर्ग व जंगल संपत्ती वाचविण्याचा संदेश देण्यात आला.या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून सहकारी साखर संघाचे राज्य उपाध्यक्ष श्रीराम शेटे, तहसीलदार कैलास पवार, कादवा सहकारी साखर कारखाना माजी संचालक संजय पडोळ, नाशिक जिल्हा पोलीस पाटील संघटना जिल्हाध्यक्ष चिंतामण मोरे, जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे आदी व्यासपिठावर उपस्थित होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेचे पुजन व दिप दीपप्रज्वलनाने कार्यक्र माची सुरु वात करण्यात आली. चिंतामण पाटील मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्र म प्रसंगी, जिल्हा भरातून आलेल्या पोलिस पाटलांच्या विविध समस्या व जाणून घेत त्या मार्गी लावण्यासाठी तालूकावार स्नेह मेळावे आयोजित करण्यात येत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.यावेळी उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले. दिंडोरी तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील मुळाणे यांनी प्रास्ताविक मांडले, तर सुत्रसंचालन संतोष कथार यांनी केले. कार्यक्र म यशस्वीतेसाठी अशोक सांगळे, वामन पाटील, संजय पाटील धात्रक, श्रीमती बोडके, श्रीमती स्वाती कळमकर, श्रीमती अनवट, महाले, रोशन परदेशी, निलेश बोडके आदींनी परिश्रम घेतले.
गांव कामगार पोलीस पाटील दिनी दिंडोरीत स्नेह मेळावा विविध उपक्र म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 6:31 PM
दिंडोरी : महाराष्ट्र राज्य गांव कामगार दिंडोरी पोलीस पाटील संघटनेच्या वतीने पोलीस पाटील दिन व स्नेह मेळावा निमित्ताने सेवानिवृत्त पोलिस पाटलांना पुष्प गुच्छ व सन्मान चिन्ह देवून गौरवण्यात आले. यावेळी वृक्षारोपण करून, निसर्ग व जंगल संपत्ती वाचविण्याचा संदेश देण्यात आला.
ठळक मुद्देनिसर्ग व जंगल संपत्ती वाचविण्याचा संदेश देण्यात आला.