जुनी शेमळी : बागलाण तालुक्यातील जुनी शेमळी आराई, नवी शेमळी परिसरात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार गेल्या अनेक दिवसापासून होत असून यामुळे ग्रामस्थ वीज वितरण कंपनीवर नाराजी व्यक्त करत आहेत. पावसाच्या थोड्या सरी कोसळल्या तर लगेच विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने परिसरात ग्रामस्थांमध्ये विद्युत महामंडळाबद्दल रोष निर्माण होत आहे.परिसरात अजून दमदार पाऊस नसल्यामुळे नागरिक उकाड्यापासून त्रस्त आहेत. विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे अनेक ऑनलाईन कामांना देखील अडचण निर्माण होत आहे. हा विद्युत पुरवठा सात ते आठ गावान जोडल्यापासून जास्त खंडीत होत असल्याचा ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पूर्वी आराई, जुनी शेमळी, नवी शेमळी या तीन गाव आर आणि गावठाणला होते त्याच पद्धतीने विद्युत पुरवठा करून तिन्ही गावांची होणारी गैरसोय विद्युत महामंडळाने लवकरच पूर्ववत करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.जुनी शेमळी ग्रामपंचायतीचे वतीने निवेदन देऊन देखील यामध्ये फेरबदल न झाल्यामुळे येणाऱ्या काळात विद्युत महामंडळातील अभियंत्यांना घेराव घालण्याचा इशारा आराईच्या सरपंच मनीषा आहिरे, जुनी शेमळीच्या सरपंच वैशाली शेलार, नवी शेमळीच्या सरपंच सीमा बधान व तिन्ही गावांच्या ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.एवढ्या आठ दिवसात जर विद्युत महामंडळाने पहिल्यासारखा विद्युत पुरवठा सुरळीत केला नाही तर शिवसेनेतर्फे रास्ता रोको करण्याचा इशारा शिवसेनेचे गटप्रमुख कैलास खैरनार यांनी पुण्यनगरी शी बोलताना सांगितले. गेल्या अनेक दिवसापासून गावातील विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे संपूर्ण गावामध्ये अंधाराचे साम्राज्य असते यामुळे चोऱ्या होण्याचे प्रमाण देखील वाढू शकते. रात्रीच्या वेळेस बाहेर निघण्यासाठी महिलावर्ग घाबरतात, गावातील विद्युत पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करून होणारी अडचण दूर करावी.जुनी शेमळी परिसरात बऱ्याच दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून आराई गावठाणला आठ गाव जोडला असून या गावांमध्ये विजेची तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास सर्व गावांचा वीज पुरवठा खंडित होतो. यासंदर्भात कार्यकारी अभियंता यांना गेल्या दोन वर्षापासून दोन वेळा निवेदन देऊन हा प्रश्न सोडवला जात नाही. या विषयावर मार्ग निघाला नाही तर वीज बिल न भरण्याचा निर्णय सर्व ग्रामस्थ मिळवून घेऊ.- अमोल बच्छाव, माजी सरपंच, जुनी शेमळी.
ग्रामस्थांची वीज वितरण कंपनीवर नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 11:29 PM
जुनी शेमळी : बागलाण तालुक्यातील जुनी शेमळी आराई, नवी शेमळी परिसरात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार गेल्या अनेक दिवसापासून होत असून यामुळे ग्रामस्थ वीज वितरण कंपनीवर नाराजी व्यक्त करत आहेत. पावसाच्या थोड्या सरी कोसळल्या तर लगेच विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने परिसरात ग्रामस्थांमध्ये विद्युत महामंडळाबद्दल रोष निर्माण होत आहे.
ठळक मुद्देवीज अभियंत्यांना निवेदने देऊनही कुठलाच निर्णय नाही