शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

मुळवडच्या वळण गावात ग्रामस्थ विजेवाचुन वंचित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 6:21 PM

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील मौजे मुळवड ग्रामपंचायत हद्दीतील वळण या छोट्या गावातील बहुतेक घरातील सर्व ग्रामस्थ आपापल्या शेतात घरे बांधुन वसाहतीने राहतात. हेतु एकच की, वर्षाचे धान्य पिकवणे त्याची राखण करणे. तसेच सिझन प्रमाणे बाराही महिने शेतात काही ना काही पिके काढत त्यापासून उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न असतो, त्यादृष्टीने राहत्या वस्तीत नागरी सुविधा मिळण्यासाठी तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना निवेदनाद्वारे साकडे घातले आहे.

ठळक मुद्देआम्हाला अंधारातून प्रकाशा कडे घेवुन चला. यासाठी हे निवेदन दिले आहे.

लोकमत न्युज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : तालुक्यातील मौजे मुळवड ग्रामपंचायत हद्दीतील वळण या छोट्या गावातील बहुतेक घरातील सर्व ग्रामस्थ आपापल्या शेतात घरे बांधुन वसाहतीने राहतात. हेतु एकच की, वर्षाचे धान्य पिकवणे त्याची राखण करणे. तसेच सिझन प्रमाणे बाराही महिने शेतात काही ना काही पिके काढत त्यापासून उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न असतो, त्यादृष्टीने राहत्या वस्तीत नागरी सुविधा मिळण्यासाठी तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना निवेदनाद्वारे साकडे घातले आहे.ग्रामपंचायत मुलवड पैकी वळण या गावातील शेतकरी गेल्या ४/५ वर्षापासून सर्व कुटूंबा सहीत शेतावर राहत असून त्यांना कुठलीच लाईट सोय नसून सर्व कुटूंबे अंधारातच वास्तव्य करु न आहेत. याबाबतचे वास्तव आमदार हिरामण खोसकर यांना एका निवेदनाद्वारे दिले आहे. त्यांच्या माध्यमातून तरी आम्हाला अंधारातून प्रकाशा कडे घेवुन चला. यासाठी हे निवेदन दिले आहे. त्यात असेही म्हटले हे की. स्वातंत्र्य मिळुन ७३ वर्षांचा काळ लोटला आहे. आम्ही अंधारातच चाचपडतो आहोत. या जंगलात प्राणी, पशु, पक्षी आदींचे वास्तव्य असते. त्यांच्यापासून शेतकरी व त्याच्या कुटुंबियांना सतत धोका असल्यामुळे काही ठिकाणी विजेची व्यवस्था केली तर निदान घराबाहेर विजेचा बल्ब तरी लावता येईल. ग्राम पंचायतीला स्ट्रीटलाईट लावता येईल. रात्रीच्या वेळी-अवेळी कोणतीही गरज भासल्यास तेथे विद्युत लाईट असणे गरजेचे आहे. विज वितरणाची व्यवस्था करावी अशी विनंती केली आहे. या निवेदनावर रघुनाथ घाटाळ, लाडकू घाटाळ, रामदास घाटाळ, वसंत घाटाळ, पांडू घाटाळ, रामजी नेवळ, दलू पिठोले, तुळशीराम राऊत, काकडू राऊत, भिवा पिठोले, रघुनाथ घाटाळ आदींच्या स्वाक्षरी आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीelectricityवीज